Tuesday, April 16, 2024
Homeपुणेमावळमावळातील पर्यटनस्थळे बंद असतानाही कार्ला परिसरात पर्यटकांची मोठी वर्दळ....

मावळातील पर्यटनस्थळे बंद असतानाही कार्ला परिसरात पर्यटकांची मोठी वर्दळ….

कार्ला- मावळ. (प्रतिनिधी गणेश कुंभार दी.16 ऑगस्ट 2020) कार्ला- कार्ला परिसरातील कार्ला लेणी ,भाजे लेणी ,लोहगड, विसापूर, या पर्यटन स्थळांवर शासनाने पर्यटकांना फिरण्यासाठी निर्बंध घातले असताना देखील पर्यटक थांबताना दिसत नाहीत. मावळ तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया वेगाने वाढत आहे त्यासाठी सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे असून लोणावळ्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना मात्र याची काही पडलेली नाही.

त्यामुळे लोणावळा परिसरातील पर्यटन स्थळांवर वर्षाविहारासाठी जाण्याकरिता पर्यटक गर्दी करताना दिसत आहेत,शनिवारी दि. १५ ऑगस्ट पर्यटकांनी कार्ला परिसरातील भाजेधबधबा व विसापूर लोहगड किल्याकडे जाणा-या मार्गावर गर्दी करताना दिसले .


परंतु कार्ला फाटा येथे लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे, सहायक निरीक्षक निरंजन रनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली भुषण कुवर,गणेश होळकर,विशाल जांभळे,अमित ठोसर नवनाथ चिमटे,सागर कुंभार,अनिकेत इंगवले यांनी कार्ला फाटा येथे व तसेच मळवली येथे लोणावळा ग्रामीणचे शरद जाधववर, पोलिस हवालदार दुर्गा जाधव ,नागनाथ जगताप यांनी चेकपोस्ट लावत विसापूर, लोहगड भाजे कडे जानारऱ्या पर्यटकांना माघारी पाठवले जात आहे. कार्ला परिसरातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांचा वावर वाढत आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या चिंतेत भर पडु शकते.

- Advertisment -

You cannot copy content of this page