Friday, March 29, 2024
Homeपुणेमावळमावळातील 9 ग्रामपंचायतिच्या पोट निवडणुका 5 जून रोजी होणार..

मावळातील 9 ग्रामपंचायतिच्या पोट निवडणुका 5 जून रोजी होणार..

मावळ : राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील निधन , राजीनामा , अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे . 5 जून रोजी मतदान तर 6 जून रोजी मतमोजणी होणार आहे . या संदर्भात तहसिलदार निवडणूकीची नोटीस गुरुवारी ( दि . 5 मे ) प्रसिद्ध करणार आहेत.

त्यानुसार मावळातील 9 ग्रामपंचायतीमधील एकूण 10 रिक्त जागेची पोट निवडणूक होणार असून यामध्ये उदेवाडी मधील प्रभाग क्रमांक 3 मध्ये अनुसूचित जमाती साठीची जागा 2018 रोजी झालेल्या निवडणुकीत अर्ज न भरल्याने तेव्हा पासून रिक्त होती . साळुंब्रे येथील प्रभाग क्रमांक 2 मधील सर्वसाधारण स्त्री साठीची जागा तेथील तत्कालीन सदस्य मयत झाल्याने 1 डिसेंबर 2021 पासून रिक्त होती . गोवित्री येथील प्रभाग क्रमांक 1 मधील सर्वसाधारण स्त्रीची जागा तत्कालीन सदस्याने 18 मार्च 2022 रोजी राजीनामा दिल्याने रिक्त होती . तसेच गोवित्रीतील प्रभागक्रमांक 3 मधील अनुसूचित जमातीसाठीची जागा तेथील सदस्याने राजीनामा दिल्याने 27 एप्रिल 2021 पासून रिक्त होती.

कुसवली येथील प्रभाग क्रमांक 1 मधील अनुसूचित जागेवरील सदस्य 26 जून 2021 रोजी मयत झाल्याने तेथील जागा रिक्त होती . चिखलसे येथील प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग साठीची जागा तत्कालीन सदस्याने 26 नोव्हेंबर 2021 रोजी राजीनामा दिल्याने रिक्त झाली होती . ओझर्डे येथील प्रभाग क्रमांक 1 मधील सर्वसाधारण स्त्री साठीची जागा सदस्याने 26 नोव्हेंबर 2021 रोजी राजीनामा दिल्याने रिक्त झाली होती.

टाकवे बु . येथील प्रभाग क्रमांक 1 मधील सर्वसाधारण जागा 10 जानेवारी 2022 रोजी सदस्याने राजीनामा दिल्याने रिक्त झाली होती . खांड येथील प्रभाग क्रमांक 1 मधील सर्वसाधारण जागा 6 एप्रिल 2022 रोजी सदस्याने राजीनामा दिल्याने रिक्त झाली होती . व ताजे येथील प्रभाग क्रमांक 2 मधील सर्वसाधारण स्त्री साठीची जागा तेथील सदस्याने 21मार्च 2022 रोजी राजीनामा दिल्याने रिक्त झाली होती .

- Advertisment -

You cannot copy content of this page