Thursday, March 28, 2024
Homeपुणेलोणावळामावळातून बेकायदेशीर धंदे हद्दपार करणार... नवनीत कॉवत ( भा. पो. से. )

मावळातून बेकायदेशीर धंदे हद्दपार करणार… नवनीत कॉवत ( भा. पो. से. )

उपविभागीय सहाय्यक पोलीस अधीक्षक लोणावळा उपविभाग नवनीत कुमार कॉवत हे मावळातील धंद्यांविरोधात आक्रमक झाले आहेत. मावळातील सुरु असलेले बेकायदेशीर धंदे धुळीस मिळविण्याचा विडा त्यांनी उचलला आहे.त्याच अनुषंगाने मावळात सुरु असलेली बेकायदेशीर दारू विक्री, मटका, जुगार व गांजा सारखे नशेचे पदार्थ विक्री यासारख्या धंद्यांवर धडक कारवाई त्यांच्याकडून करण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी कामशेत येथील पवना नगर रोडवर लोणावळा ग्रामीण पोलीस, कामशेत शहर पोलीस व एल सि बी यांची एक टिम तयार करून करण्यात आलेल्या कारवाई मध्ये 578किलो 500 ग्रॅम असा 86 लाख 77 हजार 500 रुपये किमतीचा अवैध गांजा जप्त करून कारवाई करण्यात आली त्याच प्रमाणे काही ठिकाणी बेकायदेशीर दारू विक्री धंद्यांवरही त्यांनी पोलीस टीमच्या साहाय्याने छापा मारून कारवाई केलेली आहे.

तसेच लोणावळा शहरातील मटक्याच्या धंद्यावरही नवनीत कॉवत यांच्या उपस्थितीत छापा मारून एकूण 46 हजार 480 रु.मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली आहे. सदर बेकायदेशीर धंद्यांवर करण्यात आलेल्या कारवाई संदर्भात ” अष्ट दिशा ” ई – न्यूजच्या मावळ प्रतिनिधींनी त्यांच्याशी चर्चा केली असता सामान्य नागरिक हा अशा बेकायदेशीर धंद्यांना बळी पडला असून आपल्या परिवाराकडे दुर्लक्ष करून ह्या बेकायदेशीर धंद्यांकडे आकर्षित होत आहे.

दिवसभर मेहनत करून एक व्यक्ती पाचशे रु. कमावतो आणि तेच रुपये तो मटका, जुगार आणि दारूसारख्या व्यसनामध्ये गमावतो अशा नागरिकांनी आपल्या परिवाराकडे जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे त्यांची काळजी घेतली पाहिजे तरच त्याच्या मेहनतीचे खरे चीज होईल असे त्यांनी सांगितले आणि त्याच संदर्भात सामान्य परिवारांचे नुकसान होऊ नये म्हणून मावळातून बेकायदेशीर धंद्यांना हद्दपार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सदरच्या कारवाई मध्ये पोलीस सहकाऱ्यांचीही अप्रतिम मदत मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले, आणि आपल्या भागात व परिसरात सुरु असलेल्या बेकायदेशीर धंद्यांविषयीची तक्रार घेऊन नागरिक थेट लोणावळा उपविभाग कार्यालयात येऊ शकता, आल्यास त्यासंदर्भात आम्ही नक्कीच कारवाई करू असे आवाहन मावळातील नागरिकांना करण्यात आले आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page