Wednesday, April 17, 2024
Homeपुणेमावळमावळात ग्रामपंचायत निवडणुकीत 19 जागापैकी 15 जागा बिनविरोध...

मावळात ग्रामपंचायत निवडणुकीत 19 जागापैकी 15 जागा बिनविरोध…

मावळ, दि.10 – मावळ तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींच्या रिक्त असलेल्या 19 जागांसाठी येत्या 21 डिसेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी 43 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

तालुक्यातील 15 ग्रामपंचायतीच्या 19 जागांपैकी 15 जागा बिनविरोध झाल्या असून एक जागा रिक्त राहिली आहे. उर्वरित तीन ग्रामपंचायतीच्या तीन जागांसाठी सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले असल्याची माहिती नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी दिली.

अर्ज माघारी घेण्याचा गुरुवारी दि.9 रोजी शेवटचा दिवस होता. दिवसभरात 22 जणांनी माघार घेतली. त्यामुळे 19 पैकी 16 जागा बिनविरोध झाल्या आहेत.

त्या पुढील प्रमाणे- नाणोली तर्फे चाकण- शुभांगी दीपक लोंढे, केवरे- हनुमंत निवृत्ती गोणते,औंढे खुर्द- रवी ऊर्फ गोपाळ मानकर, गोडुंब्रे- मनीषा विलास येवले, टाकवे खुर्द- बाळासाहेब पंढरीनाथ पिंपरे, आंबी- बायडाबाई बाबासाहेब घोजगे, करूंज-संतोष बाबू जाधव, नवलाख उंब्रे- विजया अप्पा शेटे, बेबेडओहळ- संदीप गणपत घारे, सुधीर बबन गायकवाड, साळुंब्रे-सीमा राहुल राक्षे, जांबवडे- सागर केशव नाटक, सुनीता सोपान भांगरे, मंगेश दिलीप भोसले, ठाकूरसाई- मंगल संतोष कारके, उधेवाडी येथील अनुसूचित जमातीची जागा रिक्त राहिली आहे.

आता केवळ मळवंडी ठुले, धामणे व साळुब्रे येथील प्रत्येकी एका जागेसाठी 21 तारखेला मतदान होणार आहे. त्यासाठी सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ते पुढील प्रमाणे मळवंडी ठुले- रोहिणी पंकज ठुले व वंदना ज्ञानेश्वर बेनगुडे, धामणे – मोनाली ऊर्फ सोनाली सुनील थोरवे व स्वीटी सतीश गायकवाड, साळुब्रे- सुजाता जगन्नाथ अनपट व अर्चना संतोष विधाटे.

- Advertisment -

You cannot copy content of this page