Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड"मी. इंडिया 2022" या खिताबाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी सलग दुसऱ्यांदा...

“मी. इंडिया 2022” या खिताबाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी सलग दुसऱ्यांदा मानकरी…

खोपोली : महामार्गाचे सहायक पोलिस निरीक्षक सुभाष पुजारी सलग दुसऱ्यांदा मास्टर ” मिस्टर भारत श्री 2022 ” या किताबाचे मानकरी ठरले आहेत.

इंडियन बॉडीबिल्डींग फेडरेशन यांच्यावतीने पाँडेचरी तामिळनाडू या ठिकाणी 22 – 23 फेबू 2022 रोजी आयोजित करण्यात आलेल्या ” मास्टर भारत श्री 2022 ” या शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये महामार्ग पोलिस केंद्र पळस्पेचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी 80 किलो वरील गटामध्ये सुवर्णपदक पटकाविले आणि गौरवाची बाब म्हणजे हा किताब त्यांनी सलग दुसऱ्यांदा पटकाविला.

15 जुलै रोजी मालदीव येथे होणाऱ्या “ मि.एशिया 2022 ” या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी भारतीय संघातून त्यांची निवड करण्यात आलेली आहे . ते सध्या मि.ऑलिम्पिया सुनीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page