Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पिकअप उलटून अपघात 1 मृत्यू 1 जखमी...

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पिकअप उलटून अपघात 1 मृत्यू 1 जखमी…

खोपोली :मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर किलोमीटर 36 च्या दरम्यान पहाटे 3 च्या सुमारास पिकअप चा भीषण अपघात झाला आहे.

पुण्या कडून मुंबईकडे जाणाऱ्या मालवाहू पिकअप क्र. MH 12 SX 9587 गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने पीकअप रस्त्यालगत असलेल्या क्रॅश बॅरियरला धडक दिल्याने ती रस्त्यावरच उलटली. यातील चालक सचिन शिंदे ( रा. भवानी पेठ, पुणे ) याचा जागीच मृत्यू झाला तर क्लीनर सागर वसंत चव्हाण ( वय 38, रा. महर्षी नगर, गोलटेकडी, पुणे ) हा किरकोळ जखमी झाला असून याच्यावर खोपोली नगरपालिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अपघाताची माहिती कळताच आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महामार्ग पोलिस, लोकमान्यांची आरोग्य यंत्रणा, सेव लाईफ फाऊंडेशनचे कर्मचारी, मृत्युंजय देवदूत आणि खोपोली पोलिस घटना स्थळी दाखल होऊन मदत कार्यात व्यस्त होते. मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी खोपोली नगरपालिका हॉस्पिटल मध्ये नेण्यात आला आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page