Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमुंबई पूणे जुन्या महामार्गावर अपघात, एक जण ठार तर दोन जण गंभीर...

मुंबई पूणे जुन्या महामार्गावर अपघात, एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी..

खोपोली- दत्तात्रय शेडगे

मुंबई पुणे आज जुन्या महामार्गावर माधव बाग जवळ एका कारने समोरील झाडाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला,या अपघातात कार मधील एक जण ठार दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.


मुंबई पुणे जुन्या महामार्गावरून पनवेल हुन खोपोलीच्या दिशेने ही कार (क्रमांक एम एच46 बी ए 1613) येत असताना ती खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माधवबाग जवळ आली असता कार ने समोरील झाडाला धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात कार मधील एक जण जागीच ठार तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत,जखमींना पुढील उपचारासाठी तात्काळ एमजीएम पनवेल येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

- Advertisment -

You cannot copy content of this page