Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमुबंई पुणे एक्सप्रेस वेवर बसने दिली दोन वाहनांना धडक, बस घसरून रस्त्याच्या...

मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर बसने दिली दोन वाहनांना धडक, बस घसरून रस्त्याच्या कडेला आदळली…


खालापूर-दत्तात्रय शेडगे

पुणे एक्सप्रेस वेवर जवळ भरधाव वेगात जाणाऱ्या आराम बस ने समोरील दोन वाहनांना जोरदार धडक देऊन बस रस्त्याच्या कडेला जाऊन आदळलुन अपघात झाला या अपघातात बस मधील एक प्रवासी गंभीर जखमी तर अन्य चार जण किरकोळ जखमी झाले आहेत.

मुबंई हुन पुण्याकडे आराम बस ही भरधाव वेगाने जात असताना ती बोरघाटात दस्तूरी येथील अवघड वळणावर आली असताना तिने समोरील टेम्पो व कार ला धडक देऊन बस घसरून ती रस्त्याच्या कडेला जाऊन आदलुन अपघात झाला, या अपघातात एक जण प्रवासी गंभीर जखमी झाला आहे तर अन्य चार जण किरकोळ जखमी आहेत, त्यांना पुढील उपचारासाठी पवना हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले.


या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस, बोरघाट पोलीस, अपघातग्रस्त मदतीचे संस्थेचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल होत बस मध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात मदत केली.

- Advertisment -

You cannot copy content of this page