Thursday, March 28, 2024
Homeक्राईममोका गुन्ह्यातील फरार आरोपी कुख्यात गुंड विठ्ठल महादेव शेलार लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या...

मोका गुन्ह्यातील फरार आरोपी कुख्यात गुंड विठ्ठल महादेव शेलार लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात… पाच पीडित महिलांची सुटका

लोणावळा दि.7: लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कार्ला येथील बंगल्यावर छापा मारून हिंजवडी येथील मोका गुन्ह्यातील फरार असलेला आरोपी विठ्ठल महादेव शेलार व त्याचे दोन साथीदार यांना चव्वेचाळीस लाख, बत्तीसहजाराच्या मुद्देमालासह पोलिसांनी अटक केली.बेकायदेशीर धंदयाच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलिसांचे कारवाई सत्र सुरु असता ही कारवाई करण्यात आली आहे.

लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांना गुप्त सूत्रांकडून माहिती मिळाली की कार्ला गावाच्या हद्दीतील बेंद्रेज हॉलिडे होममधील अनिरुद्ध गांधी यांच्या मालकीच्या बंगल्यात वेश्या व्यवसाय सुरु आहे.

गुप्त सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक लोणावळा विभाग ASP नवनीत कॉवत, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, उपनिरीक्षक अनिल लवटे, पोलीस हवालदार शकील शेख, कुतूब खान, पोलीस नाईक मयूर अबनावे, महिला पोलीस शिपाई रुपाली कोहिनकर, अश्विनी लोखंडे, पोलीस शिपाई स्वप्नील पाटील, रहीस मुलाणी, संतोष वाडेकर, हनुमंत शिंदे, भूषण कुवर, सुभाष शिंदे, अंकुश पवार, होमगार्ड शंकर खेंगरे, अनिकेत पाटील यांनी ही कारवाई केली आहे.

लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी दिलेल्या माहिती नुसार दि.6 रोजी ASP कॉवत यांना माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुजावर, पोलीस उपनिरीक्षक लवटे इतर पोलीस आणि दोन पंच यांनी वेषांतर करून ग्राहकांच्या भूमिकेत सदर घटनास्थळी जाऊन छापा मारला असता त्याठिकाणी वेश्या व्यवसाय करणाऱ्या पाच पीडित महिला आणि मोका गुन्ह्यातील फरार आरोपी विठ्ठल महादेव शेलार ( वय 32, रा. शिवतेज नगर, हिंजवडी, ता. मुळशी, पुणे ), अशोक दादा खरात ( वय 26, रा. गुजरवाडी, कात्रज, पुणे ),
राजू दशरथ बहिरे ( वय 30, रा. आशीर्वाद कॉलनी, रहाटणी, पुणे ) हे चव्वेचाळीस लाख, बत्तीस हजार रुपयांच्या मुद्देमालासह मिळून आले.

त्यांचे इतर साथीदार पळून गेले असता कुख्यात गुंड विठ्ठल शेलार याला ताब्यात घेण्यात मात्र पोलीस पथकाला यश आले आहे. ASP कॉवत यांनी पाच पीडित महिलांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता आरोपी विठ्ठल शेलार हा त्यांच्याकडून प्रत्येकी ग्राहकांकडून प्रति रुपये 1000 घेऊन वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे पीडितांनी सांगितले.

त्यानंतर त्या पाच पीडित महिलांना सुरक्षा गृह मुडवा येथे ठेवण्यात आले तर सदर आरोपींवर भा द वी कलम 370(1),188,269,270 व अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3,4,5,7(1)(ब )तसेच साथीचे रोग प्रतिबंध कायदा कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर करीत आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page