Tuesday, April 16, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमोबाईल चोरीतील मूळ आरोपीस अटक करून चोरीचा केला उलगडा !

मोबाईल चोरीतील मूळ आरोपीस अटक करून चोरीचा केला उलगडा !

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनवणे)आजकाल मोबाईलचे आकर्षण सर्वांनाच आहे . आपल्याकडे चांगल्या प्रतीचा मोबाईल असावा अशी इच्छा असताना ती मिळवण्याची पद्धत अनेक जण गुन्हेगारी प्रवृत्तीने करत असल्याने हि चुकीची पद्धत त्यांच्याच गळी पडते .आधुनिक आणि तंत्रज्ञान युगात मोबाईल चोरी दडून रहात नाही . अश्याच एका मोबाईल चोरीचा उलगडा कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याच्या जवानांनी करून मोबाईल चोराला जेरबंद केले.
विनोद आनंदा गोंडेपाटील, वय ५० वर्ष, धंदा – कंष्ट्रक्शन, रा . ए / ३०४, तिसरा माळा, गावदेव जवळ , मानपाडा, डोंबिवली , हे रेल्वे प्रवासी दिनांक ०९ डिसेंबर २०२१ रोजी ११ – ५५ वा. ते १२ – २० वा. दरम्यान कर्जत ते खोपोली रेल्वे स्टेशन दरम्यान मोटरमनकडील दुसऱ्या डब्यात बसुन प्रवास करीत असताना, त्यांचा मोबाईल फोन कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या नकळतपणे मुद्दाम लबाडीने चोरून नेल्याने कर्जत रेल्वे पोलीस ठाणे येथे गु.र.नं ७८/२०२१ कलम ३७९ भादवि गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्यातील चोरीस गेलेला मोबाईल फोनचे तांत्रिक पद्धतीने तपास करून, तसेच खास खबरी मार्फत गुन्हे तपास पथकातील पोलीस अमलदार पोलीस हवालदार ज्ञानेश्वर पाटील, पोलीस नाईक सुनिल ठाकुर, पोलीस शिपाई समीर पठाण यांनी सदर इसमाचा शोध घेतला असता, सदरचा इसम हा एरंजाड, बदलापुर येथे राहत असल्याचे समजल्याने तेथे जाऊन शोध घेऊन, सदर इसम दिसुन आल्याने त्यास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणुन चौकशी केली असता.
नमुद गुन्ह्यातील चोरीस गेलेला मोबाईल फोन हा त्यानेच चोरी केला असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने,इसम नामे सुमितकुमार रामकुमार यादव, वय २४ वर्ष, धंदा – मजुरी, रा . एरंजाड, बदलापुर, ठाणे, मुळगाव – सोनवरी, पो. ढोकवरी, ता. जागरस, जि. सापतारा, झारखंड याच्याकडून गुन्ह्यात चोरून नेलेले एकूण १०.५००/- रुपये किमतीचा एक काळ्या रंगाचा, रेड मी एम आय कंपनीचा मोबाईल फोन त्याचा आय. एम. ई. आय ८६८०३४०५२४७३३४५ जु. वा. दोन पंचा समक्ष जप्त करून, त्यास नमुद गुन्ह्यात अटक करून मा. लोहमार्ग न्यायालय, कल्याण येथे रिमांड रिपोर्ट सह हजर केला.सदर मोबाईल चोरीचा गुन्हा तातडीने उलगडा झाल्याने संभाजी यादव – वरिष्ठ पोलीस निरीक्षक , कर्जत रेल्वे पोलीस ठाणे यांनी पोलीस जवानांचे कौतुक केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page