रक्तदान व आरोग्य शिबिर घेऊन हालीवली सरपंच सौ.प्रमिला बोराडे यांचे देशव्यापी कार्यात सहभाग ! - ASHTADISHA Covers Marathi News Nation wide
Home महाराष्ट्र रायगड रक्तदान व आरोग्य शिबिर घेऊन हालीवली सरपंच सौ.प्रमिला बोराडे यांचे देशव्यापी कार्यात...

रक्तदान व आरोग्य शिबिर घेऊन हालीवली सरपंच सौ.प्रमिला बोराडे यांचे देशव्यापी कार्यात सहभाग !

0

पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग..

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
कर्जत तालुक्यातील हालिवली ग्रामपंचायतच्या सरपंच सौ.प्रमिला सुरेश बोराडे यांच्या सामाजिक कार्याचा आलेख दिवसेंदिवस वाढत असून लोकोपयोगी कामे करून त्यांनी नागरिकांची मने जिंकली आहेत . स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हालीवली ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.प्रमिला बोराडे यांच्या वतीने व सुमन्तु फाउंडेशन – कर्जत यांच्या सहकार्याने हालिवली गावात दि. १३ ऑगस्ट २०२१ रोजी रक्तदान शिबीर व सर्व प्रकारच्या आजारांविषयी निदान व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.

यामुळे राष्ट्रव्यापी कार्यात देखील त्यांचा सहभाग प्रामुख्याने दिसून येत आहे.हालिवली गावात सरपंच सौ. प्रमिला बोराडे यांनी गेल्या दोन वर्षात अनेक आरोग्य शिबिरे घेतली.कोरोना काळात रक्ताचा भासणारा तुटवडा लक्ष्यात घेता व मा.मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या रक्तदान शिबिरे घ्या,या आवाहनाला प्रतिसाद देत हालीवली गावात आजपर्यंत कधीही न झालेले रक्तदान शिबीर सरपंच सौ.प्रमिला सुरेश बोराडे यांनी घेतले ,आणि त्याला गावातील तरूणांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला.

याबद्दल सरपंचांनी आनंद व्यक्त करत तरुणांचे व ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले.तर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी व महिलांनी आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ घेतला.या कार्यक्रमाचे वेळी मा .विभाग प्रमुख सुरेश बोराडे, प्रा.शाळेचे शिक्षक पाटील सर, उपसरपंच केतन बोराडे, सदस्या मेघा बोराडे,दर्शना बोराडे, सोनम जाधव,जनाबाई चौधरी कर्मचारी सोपान बोराडे, मनोहर बोराडे आदी उपस्थित राहून मेहनत घेतली.तर रक्तदानासाठी अनेक ग्रामस्थांनी पुढाकार दाखविला.त्यापैकी सुभाष हाडप,जयवंत बोराडे, रुपेश म्हस्कर,प्रकाश बोराडे,संदिप बोराडे,अंकुश मरगळे, रामलखन,शिबुनायर इत्यादींना रक्तदान करून देशव्यापी कार्यात सहभागी झाले.

यावेळी ग्रामपंचायत हालीवली व सुमंतु फाउंडेशन तसेच सुमंतु हॉस्पिटल,कर्जत यांच्या सहकार्याने या रक्तदान व आरोग्य शिबिरासाठी शिबिरासाठी सुमंतु हॉस्पिटलचे डॉ.सुनील तुकाराम ढवळे, डॉ. ईश्वरी सुनील ढवळे, पंढरीनाथ मिरकुटे, अक्षदा जाधव – सिस्टर, भाग्यश्री गायकवाड, माया भालेराव या हॉस्पिटल स्टाफ चे सहकार्य लाभले. रक्तदानासाठी समर्पण ब्लड बँक , घाटकोपर यांचे विशेष सहकार्य लाभले.समर्पण ब्लड बँकेच्या वतीने श्री दीपेश सरदार रक्तदानाच्या वेळी उपस्थित होते.

You cannot copy content of this page

Exit mobile version