Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईराज्य सरकारचा मोठा निर्णय राज्यात स्कॉच व्हिस्कीचे दर केले कमी..

राज्य सरकारचा मोठा निर्णय राज्यात स्कॉच व्हिस्कीचे दर केले कमी..

मुंबई : महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने आयात किंवा आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात केली आहे.

त्यामुळे राज्यातील स्कॉच व्हिस्की ची किंमत इतर राज्यांच्या बरोबरीने झाली असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क उत्पादन खर्चातून 300 वरून 150 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली असल्याची अधीसूचना गुरुवारी जारी करण्यात आली आहे .

आयात केलेल्या स्कॉचच्या विक्रीतून महाराष्ट्र सरकारला वार्षिक 100 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. या कपातीतून सरकारचा महसूल 250 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे, कारण त्यामुळे एक लाख बाटल्यांवरून 2.5 लाख बाटल्यांची विक्री वाढेल असे सांगण्यात आले आहे. तसेच
बनावट दारूच्या विक्रीला आळा बसणार असल्याची शक्यता आहे .

शुल्कात कपात केल्यामुळे इतर राज्यांतून होणारी स्कॉचची तस्करी आणि बनावट दारूच्या विक्रीलाही आळा बसणार असून महाराष्ट्रात आयात होणाऱ्या व्हिस्कीच्या किमती कमी झाल्या असल्याने राज्याच्या महसुलात वाढ होईल. सध्या एका दिवसात 1 लाख बाटल्या विकल्या जातात, शुल्क कमी केल्यामुळे बाटल्यांची विक्री अडीच लाखांवर पोहोचू शकते.

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सरकारला दारूपासून सर्वाधिक महसूल मिळतो. महाराष्ट्र सरकारने उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात केली आहे. त्यामुळे व्हिस्कीच्या किमतीत कमालीची घट झाली असून आता महाराष्ट्रातील जनतेला कमी किमतीत स्कॉच मिळू शकणार आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page