Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडराज्य सरकार सेवाभावी संस्थांना पाठबळ देत ग्रामीण भागातील विकास साधेल...

राज्य सरकार सेवाभावी संस्थांना पाठबळ देत ग्रामीण भागातील विकास साधेल – उद्योगमंत्री सुभाष देसाई..

खालापूर ग्रामीण भागातील अशिक्षित अकुशल तरुणांना पहल ही संस्था ओळख देण्याचे कार्य करीत आहे अशा संस्थांची ठिकठिकाणी कार्यालय झाले पाहिजेत, अशा संस्थांच्या शाखा आपल्याकडे कशा सुरू होतील,  काम करणाऱ्यांना उत्तेजन देऊन ग्रामीण भागाच्या विकासासाठी झटले पाहिजे, असे आवाहन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी 21 सप्टेंबर खालापूर येथे केले.


गावकर्‍यांनी दिवसातले काही तास त्या गावातल्या मुलांना ट्रेनिंग देण्यासाठी कौशल्य देण्यासाठी या केंद्राचा वापर करायला द्या. स्वतंत्र विकास केंद्र आपल्या गावात तयार होण्यासाठी शाळा दिवसा वर्ग घेतात, पण संध्याकाळी आपल्याला अशा प्रकारचे अभ्यास वर्ग शाळांमध्ये घेता यावेत ह्याची सांगड घातली गेली पाहिजेत.

 कौशल्य, माहिती, ज्ञान, संपादन करून स्वतःच्या पायावर उभे राहतील एवढी सक्षम होतील आणि आपल्याबरोबर अनेकांना बरोबर घेऊन त्यांनाही मोठं करतील याची मला खात्री आहे आणि म्हणून अशा धडपडणाऱ्या मुलांच्या मागे मजबूत करणारी संस्था या मुलांना ओळख मिळवून देण्याचे पहल संस्थेने काम हातात घेतले त्यांना उत्तेजन दिले पाहिजे. अशा प्रकारच्या वाटचालीचा आनंद नाही तर अभिमान वाटेल असे महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी खालापूर येथे पहल संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी काढले.

एका प्रश्नाला उत्तर देताना मंत्री यांनी किरीट सोमय्या च नाव न घेता राज्य च्या समोर अनेक गंभीर प्रश्न असून अशा अश्या प्रश्नांकडे सध्या दुर्लक्ष केलेले बरे असे सांगितले तर स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांनी खालापूर तालुका औद्योगिक क्षेत्र असल्याने अशा प्रकारच्या संस्थांनी ग्रामीण भागातील तरुणांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले असल्याने त्या तालुक्याचा रोजगाराचा प्रश्न निकाली निघेल आमदार म्हणून मी त्यासाठी सदैव पाठीशी राहील असे सांगितले.

संस्थेचे पदाधिकारी उद्योजक भरत भाई शहा व मान्यवर उपस्थित होते यावेळी ग्रामीण भागातील तरुणांना प्रशिक्षण दिले त्याचे प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

- Advertisment -

You cannot copy content of this page