Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडरायगडचे भीष्मांचार्य , खासदार सुनील तटकरे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रम करून साजरा..

रायगडचे भीष्मांचार्य , खासदार सुनील तटकरे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रम करून साजरा..

कर्जत राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी संघटनेचा पुढाकार..

(भिसेगाव-कर्जत/सुभाष सोनावणे)
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आपली प्रदीर्घ छाप पाडून रायगडचे नाव आपल्या बहूआयामी वक्तृत्वाने गाजवणारे रायगडचे आधुनिक राजकीय भीष्मांचार्य आदरणीय खासदार सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत तालुक्यात त्यांचे जिवलग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा कर्जत – खालापूर मतदार संघाचे हॅट्रीक मारणारे माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस व विद्यार्धी संघटना यांच्या वतीने आज दि.१०जुलै २०२१ रोजी १०.१० मिनिटांनी राष्ट्रवादी भवन कर्जत – दहिवली येथे महिला अध्यक्षा रंजना धुळे यांच्या हस्ते केक कापून मोठया उत्साहात साजरा करून त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता शुभेच्छा देऊन विविध कार्यक्रमास सुरुवात केली.

आज रायगडात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो डौलाने उभा आहे , तो खासदार सुनील तटकरे यांच्याच रूपाने.घरातूनच राजकीय वारसा मिळालेले असल्याने व माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांच्या मुशीत वाढून तरबेज झाल्याने खूप कमी वयात ते सन १९९२ साली रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले.राष्ट्रीय काँग्रेसमध्ये असताना व नंतर राष्ट्रवादीत अनेक पक्षीय पद त्यांनी अनुभवले.या अनुभवाच्याच जोरावर भविष्यात गरुड भरारी घेत त्यांनी पंचायत समिती सभापती ,राजिप अध्यक्ष , आमदार ,खासदार ,पालकमंत्री , जिल्हाध्यक्ष , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष , तर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते राष्ट्रीय सरचिटणीस आहेत.

नगरविकास ,अर्थ ,ऊर्जा , जलसंपदा ,अन्न व नागरी सुरक्षा अशी विविध मंत्री पदे त्यांनी भूषवून रायगड सहित महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कार्याचा ठसा उमटविला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार साहेब ,अजितदादा, सुप्रियाताई यांचे अत्यंत निकटचे त्यांना मानले जाते.रायगडच्या राजकारणात त्यांची चौफेर नजर असते.अत्यंत शांतपणे डावपेच आखत विरोधी पक्षांना नामोहरम करण्याची त्यांची कला खूपच वाखाणण्याजोगी आहे.

म्हणूनच त्यांना रायगडचे राजकीय भीष्मांचार्य म्हणतात.त्यांच्या या कार्याला झळाली देण्यासाठी त्यांचा वाढदिवस विविध लोकपयोगी कार्यक्रम करून दरवर्षी साजरा करण्यात राष्ट्रवादी झटत असते. यावर्षी कोरोना काळात उपजिल्हा रुग्णालयात काम करणारे पालिकेचे आरोग्य विभागातील कर्मचारी, रुग्णवाहिका चालक व त्यांचे सहकारी यांचा सत्कार करण्यात आला . त्यानंतर नेरळ ग्रामीण रुग्णालय येथे बेडशीट व पिलो कव्हर देण्यात आले.

तर कशेळे हॉस्पिटलमध्ये फळवाटप करण्यात आले . यावेळी रायगड ज़िल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकरशेठ घारे ,कर्जत नगर परिषदेचे विरोधी पक्ष नेते शरदभाऊ लाड,जिल्हा उपाध्यक्षा पूजा सुर्वे , महिला ता.अध्यक्षा रंजना धुळे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सागर शेळके, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आरकेश काळोखे,नगरसेविका पुष्पा दगडे, भारती पालकर , नगरसेवक उमेश गायकवाड, वंदना हजारे,वंदना थोरवे, अल्पसंख्याक ता.अध्यक्ष दिलीप गायकवाड,वीरेंद्र जाधव,प्रमोद पिंगळे,अतुल चंचे ,सोमनाथ पालकर,राजू हजारे,भूषण पेमारे,अरुण ऐंनकर,ऋषी दाभाडे,झहीर खान,योगेश थोरवे,किशोर सावंत,चंद्रकांत मिणमिने,नितेश क्षीरसागर,तुषार देशमुख,शोयेब सय्यद,अक्षय जाधव,सुदेश हजारे आकाश शेळके,रोहित हजारे तसेच सर्व पदाधिकारी ,नगरसेवक , सरपंच – सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page