Thursday, April 25, 2024
Homeपुणेलोणावळाराष्ट्रवादी काँग्रेस लोणावळा शहराच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन…

राष्ट्रवादी काँग्रेस लोणावळा शहराच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन…

लोणावळा (प्रतिनिधी): परमपूज्य बौद्धीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महा परीनिर्वाण दिनानिमित्त लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराकडून विनम्र अभिवादन करण्यात आले.
दलितांचे कैवारी राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महा परिनिर्वाण दिनी लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस पुष्प हार अर्पण करून व घोषणा देऊन अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम लोणावळा नगरपरिषद कार्यालय येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे संपन्न झाला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विलास बडेकर,जिवन गायकवाड, नारायण पाळेकर, युवक अध्यक्ष विनोद होगले, रवींद्र भोईने, आरोही तळेगावकर, प्रवक्ता फिरोज शेख, अशोक रोकडे, पायगुडे व येवले यांसमवेत महिला कार्यकर्त्या मोठया संख्येने उपस्थित होत्या.
- Advertisment -

You cannot copy content of this page