Saturday, April 20, 2024
Homeपुणेलोणावळारोटरी क्लब लोणावळा तर्फे डॉक्टर डे उत्सहात साजरा...

रोटरी क्लब लोणावळा तर्फे डॉक्टर डे उत्सहात साजरा…

लोणावळा : रोटरी नवीन वर्ष तसेच डॉक्टर्स डे निमित्त रोटरी क्लब लोणावळा तर्फे संत ज्ञानेश्वर नगरपालिका शाळा, भांगरवाडी येथे शाळकरी मुलांसाठी वैदकीय तपासणी शिबीर घेण्यात आले.

या प्रसंगी रोटरी क्लब ची नवीन कार्यकारणी उपस्थिती होती. अध्यक्ष रो आशिष मेहता, सचिव रो पुंडलिक वानखेडे, खजिनदार रो गोरख चौधरी, माजी अध्यक्ष रो जयवंत नलोदे, उपाध्यक्ष रो दिलीप पवार, रो नितीन कल्याण, रो नारायण शारवाले, रो मुस्तफा कॉन्ट्रॅक्टर, रो फातिमा कॉन्ट्रॅक्टर, रो रवि कुलकर्णी उपस्थित होते.

प्रकल्प प्रमुख रो डॉक्टर डॉली आगरवाल यांनी या शिबिराचे नियोजन केले व मुलांची तपासणी केली. या प्रसंगी शाळेच्या मुख्यध्यपिका सौ नीता पवार यांनी सर्वांचे स्वागत केले. क्लब कडून शाळकरी मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. रो अध्यक्ष आशिष मेहता यांनी शाळेला येत्या शैक्षणिक वर्षां मध्ये अजून मदत करण्याचे आश्वासन दिले. शाळेतील शिक्षक वर्गाने खूप छान सहकार्य केले. अशा प्रकारे डॉक्टर डे उत्साहात साजरा झाला.

- Advertisment -

You cannot copy content of this page