Friday, March 29, 2024
Homeपुणेलोणावळारोटरी व क्लब महिंद्रा तर्फे लोणावळा येथे फळ झाडांचे वाटप….

रोटरी व क्लब महिंद्रा तर्फे लोणावळा येथे फळ झाडांचे वाटप….

कार्ला (प्रतिनिधी )रोटरी क्लब ऑफ लोणावळा व क्लब महिंद्रा यांच्या संयुक्त विद्यमाने आज आषाढी एकादशी निमित्त लोणावळा शहरातील लोहगड उद्यान परिसरात ५०० फळ झाडांचे वाटप करण्यात आले.रोटरी क्लबचे अध्यक्ष जयवंत नलवडे व क्लब महिंद्राचे एच आर मॅनेजर अहमद यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील नागरिकांना आंबा, पेरू, फणस, सिताफळ, अशी विविध फळ झाडे वाटप करण्यात आली.


या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष पुंडलिक वानखेडे, रवींद्र कुलकर्णी, बापूसाहेब पाटील खजिनदार गोरख चौधरी ,रो. दिलीप पवार, प्रकल्प प्रमुख अशिष मेहता व क्लब महिंद्राचे एग्रीकल्चर विभाग प्रमुख चंद्रशेखर पाटील या मान्यवरांच्या हस्ते फळझाडे वाटप करण्यात आली.याप्रसंगी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष बापूसाहेब पाटील यांनी फळ झाडांचे महत्त्व सांगतांना आपल्या पूर्वजांनी फळझाडे लावली म्हणून आज आपल्याला फळे मिळतात.

त्यांनी झाडे लावली नसती तर आपल्याला फळे कोठून मिळाली असती,भविष्यात येणाऱ्या पिढीला फळे मिळावेत या हेतूने तरी वृक्षारोपण व झाडांचे संवर्धन करणे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे, नाहीतर भविष्यात आपल्या पिढीला फळांचे फक्त चित्र दाखवावे लागतील, प्रत्यक्षात फळं नसतील.

रोटरी क्लब ऑफ लोणावळा व क्लब महिंद्रा यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम हाती घेतला आहे.रोटरी अध्यक्ष जयवंत नलवडे यांनी वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे. नैसर्गिक रित्या ऑक्सिजन निर्मिती वृक्षच करु शकतात त्यामुळे प्रत्येकाने किमान ५ झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन केले.


ओळकाईवाडी परिसरात मंदिराच्या बागेत फळ झाडांचे वृक्षारोपण जयवंत नलवडे, अहमदसर,आशिष मेहता, गोरख चौधरी व कुसगाव ग्रामस्थ यांचे हस्ते करण्यात आले.
प्रकल्प प्रमुख आशिष मेहता यांनी क्लब महिंद्रा व रोटरी पदाधिकारी,उपस्थित नागरिकांचे आभार मानले.

- Advertisment -

You cannot copy content of this page