Thursday, March 28, 2024
Homeपुणेलोणावळारोड रोमिंयोंनी सावधान मुलींची छेड काढाल तर मिळेल पोलिसांचा दणका...

रोड रोमिंयोंनी सावधान मुलींची छेड काढाल तर मिळेल पोलिसांचा दणका…

लोणावळा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणावर लोणावळा शहर पोलीस स्टेशन मध्ये भाग 5 गुन्हा रजि. नं. 37/2022 भा.द.वी. कलम 354, 354 ड, बालकांचे लैंगिक अत्याचारा पासून संरक्षण अधिनियम कलम 12 या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन उत्तम हुलावळे ( वय 30, रा. जिजामाता नगर, वलवण, लोणावळा ) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार फिर्यादी गणेश कृष्ण साठे ( वय 42, व्यवसाय कॉन्स्ट्रकशन, रा. वावले हाईट्स, सी विंग,फ्लॅट नं.111, भांगरवाडी, लोणावळा ) यांनी लोणावळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की साठे यांची मुलगी व तिच्या दोन मत्रिणी तिघीजणी त्यांचा क्लास सुटल्यानंतर दि.13 रोजी सायंकाळी 06:00 वा. च्या सुमारास लोणावळा इंद्रायणी पुलाजवळ असलेल्या आय.सी.आय.सी.आय बँकेच्या समोरून घरी येत असताना आरोपीने या तीन अल्पवयीन मुलींना तुम्ही किती छान दिसता असे म्हणून त्यांचा पाठलाग करून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे.

सदर फिर्यादे वरून लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पो स ई चौधरी यांनी गुन्हा दाखल करून घेतला असून गुन्ह्याचा पुढील तपास पो. स. ई. चौधरी हे करत आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page