Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडलसीकरणाला साथ, करू या कोरोनावर मात !

लसीकरणाला साथ, करू या कोरोनावर मात !

मुद्रे येथे कोरोना लसीकरण शिबिर यशस्वी..

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
नवकुमार स्पोर्ट्स मुद्रे , कर्जत लसीकरन संघर्ष समिती ,कर्जत नगरपरिषद व उपजिल्हा रुग्णालय कर्जत यांच्या सहकार्यातून भैरवनाथ मंदीर – मुद्रे येथे आज लसीकरन शिबिर आयोजित करण्यात आले होते . यावेळी अनेक नागरिकांनी लस घेऊन सहकार्य केले. लसीकरणास साथ देऊन , कर्जत व परिसर कोरोना मुक्त करू या , हा संदेश घेऊन मुद्रे येथील नवकुमार स्पोर्ट्स यांनी आज कोरोना लसीकरण शिबिर यशस्वी राबविले.

यावेळी प्रतिक बैलमारे, चंदू पाल, ओम पांचाळ, राहुल मोरे, योगेश तवळे, युगांत मोधले, सौरभ कडू, धीरज बैलमारे, ऋषीकेश भालिवडे, महेश हडप, भूषण कडू, इंद्रजित पाल, अमित बैलमारे, महेश लोट, सुमित बैलमारे , सोमनाथ पालकर, मिलिंद हडप, भावेश कडू , तेजस पालकर, मंदार मोधले, संकेत बैलमारे, कलिम मुल्हा, चेतन लोट, मंगेश तवळे, यश साळुंके, अभिषेक सावंत, अनिकेत साळुंके, महेश पालकर, सौरभ निगुडकर , अनंत बैलमारे, अनंत बैलमारे,विजय तवळे ,गुरुनाथ पालकर,दीपक मोधळे, रवींद्र मोधळे, अंकुश मोधळे, मयूर तवळे, महेश निगुडसे, कुणाल बैलमारे,योगेश मोधळे, राजेश तवळे ,आदित्य तवळे ,पीयूष तवळे ,जमीर शेख,मिलिंद कडू आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कर्जत लसीकरण संघर्ष समिती तर्फे ऍड . कैलास मोरे, प्रशांत उगले, विनोद पांडे ,कृष्णा जाधव, शिवसेवक गुप्ता, मुद्फुल दाभिया, मन्सूर बोहरी, जयवंत म्हसे, अजय वर्धावे, निलेश हरिश्चंद्रे , सुमेश शेटे,प्रशांत सदावर्ते, आदी सदस्य उपस्थित होते.

तर उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.मनोज बनसोडे , डॉ.संगीता दळवी व त्यांच्या टीम ने चांगले सहकार्य केले. यावेळी कोव्हीशिल्ड पहिला डोस ६९ , दुसरा डोस ३८ , तर कोव्याक्सीन पहिला डोस २० , दुसरा डोस १८ आदी नागरिकांनी लसीकरण घेऊन सहकार्य केले . नवकुमार स्पाेर्ट मुद्रे येथे लसीकरण शिबिरास नगरसेवक बळवतं घुमरे , नगरसेविका भारती पालकर , मा . नगरसेवक गुरूनाथ पालकर , शाहीर गणेश ताम्हाणे , व गावातील जेष्ठ मान्यवर तानाजी बैलमारे आदींनी भेट दिली.

- Advertisment -

You cannot copy content of this page