Thursday, March 28, 2024
Homeपुणेवडगावलोक नेते शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसा निमित्त वडगाव मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन...

लोक नेते शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसा निमित्त वडगाव मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन…

वडगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष लोक नेते आदरणीय नामदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

शहराचे पर्यावरण संवर्धन वाढीसाठी मान्यवरांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या माध्यमातून वडगाव नगरपंचायतीस मोफत एक हजार वृक्षांच्या रोपांचे हस्तांतरण करण्यात आले.

तसेच शहरतील नागरिकांनी जास्तीत जास्त इलेक्ट्रिकल वाहनांचा वापर करावा यासाठी विद्युत चलीत वाहने वापरण्यास प्राधान्य देण्यात येऊन महाविकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी इलेक्ट्रिकल वाहने खरेदी केली. स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा अभियान २.० या स्पर्धेत नगरसेवकांनी सहभाग नोंदवत खरेदी केलेल्या इलेक्ट्रिकल वाहने वापरण्याचा शुभारंभ कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बाबुराव आप्पा वायकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, मा. सभापती गणेश आप्पा ढोरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी वडगाव नगरपंचायत वतीने शहरात तयार करण्यात आलेल्या नवीन विद्युत वाहन चार्जिंग स्टेशनचा शुभारंभ नगराध्यक्ष मयूर ढोरे, मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, उपनगराध्यक्ष शारदा ढोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी वडगावकरांना सेवा देणाऱ्या स्वच्छता कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बाबुराव आप्पा वायकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, मा. सभापती गणेश आप्पा ढोरे, नगराध्यक्ष मयूर ढोरे, तज्ञ संचालक सुभाषराव जाधव, मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर, मा. उपसरपंच तुकाराम उर्फ बुवा ढोरे, उपनगराध्यक्ष शारदा ढोरे, मा. सरपंच पोपटराव वहिले, नगरसेवक राजेंद्र कुडे, सुनिल ढोरे, राहुल ढोरे, चंद्रजीत वाघमारे, दिलीप म्हाळसकर, नगरसेविका पूनम जाधव, अबोली ढोरे, माया चव्हाण, प्रमिला बाफना, पूजा वहिले, सायली म्हाळसकर, मीनाक्षी ढोरे, गंगाराम ढोरे, राजेश बाफना, सुनिल शिंदे, भाऊसाहेब ढोरे, शरद ढोरे, महेंद्र ढोरे, अतुल राऊत, मंगेश खैरे, सोमनाथ धोंगडे, प्रविण ढोरे, अमर चव्हाण, सिद्धेश ढोरे, नितीन चव्हाण,अरण कालेकर, विशाल शिंदे, अभिजीत मोहिरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आजी माजी पदाधिकारी, नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी व कार्यकर्ते तसेच मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोरोना संकटकाळात सर्वसामान्य नागरिकांचे रोजगार गेल्याने शहरातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावे यासाठी राष्ट्रवादी रोजगार सेवा केंद्राचे उदघाटन संचालक सुभाषराव जाधव, मा. उपसरपंच तुकाराम उर्फ बुवा ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे यांच्या हस्ते संपन्न झाले.

- Advertisment -

You cannot copy content of this page