Friday, April 19, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा ग्रामीण पोलिसांची कारवाई 11 हजाराची दारू जप्त व तीन जणांवर गुन्हे...

लोणावळा ग्रामीण पोलिसांची कारवाई 11 हजाराची दारू जप्त व तीन जणांवर गुन्हे दाखल…

लोणावळा दि.26: विनापरवाना दारू विक्री करणाऱ्यांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांचा छापा तब्बल 11 हजार 95 रुपयांचा अवैध दारू साठा जप्त करून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

31 डिसेंबरच्या पार्श्व् भूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याहेतू लोणावळा ग्रामीण पोलीसांच्या वतीने ” स्पेशल ड्राइव्ह ” मोहीम राबविण्यात आली. सदर मोहिमे अंतर्गत कार्ला, वेहेरगाव व औंढे येथील तीन अवैध दारू विक्रेत्यांवर धडाकेबाज कारवाई करत देशी संत्रा दारूच्या 54 बाटल्या, मॅकडोल दारूच्या 27 बाटल्या व इतर दारूच्या 14 बाटल्या असा एकूण तब्बल 11,095/ रुपयांचा दारू साठा जप्त करत 1) नंदू पांडुरंग हुलावळे,2)संतोष चिंधु शिळावणे, व 3)वैभव पांडुरंग चव्हाण या तिघांविरुद्ध अवैध दारू विक्रीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तसेच तिन्ही आरोपीं विरुद्ध लवकरच न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी दिली आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने, पोलीस उपनिरीक्षक सचिन बनकर, पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, सहाय्यक फौजदार बोकड, पोलीस हवालदार शकील शेख,अमित ठोसर,पोलीस नाईक गणेश होळकर, शरद जाधवर, भूषण कदम, किशोर पवार, पोलीस कॉन्स्टेबल विनोद गवळी, सिद्धेश्वर शिंदे, रहीस मुलाणी, अरुण पवार यांनी केली आहे.

अशा प्रकारे अवैध धंदे सुरु असल्यास लोणावळा ग्रामीण दूरध्वणी क्र.02114273036 यावर संपर्क करून पोलिसांना माहिती दयावी असे आवाहन लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येत आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page