Thursday, April 25, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा ते निगडी PMPL बस कंडक्टरांचा मनमानी कारभार , नागरिक व विध्यार्थ्यांना...

लोणावळा ते निगडी PMPL बस कंडक्टरांचा मनमानी कारभार , नागरिक व विध्यार्थ्यांना मनस्ताप..

लोणावळा : PMPL बस कंडक्टर च्या मनमानी कारभारामुळे स्थानिक नागरिक व शाळकरी मुलांना होत आहे मनस्ताप.यांच्या मनमानी कारभारावर लवकरच आवर घालण्याची मागणी काही कामगार प्रवासी, विध्यार्थी प्रवासी व पालक वर्गाकडून करण्यात येत आहे.

पुणे लोणावळा लोकल सेवा नियमित नसल्याने अनेक कामगार, जेष्ठ नागरिक व विध्यार्थ्यांना प्रवासासाठी अडचणी येत असत या सर्व अडचणी लक्षात घेऊन.निगडी ते कामशेत PMPL बस सेवा सुरु असताना लोणावळा नगरिच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव व माजी उप नगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी पुढाकार घेऊन निगडी ते लोणावळा अशी PMPL बस सेवा मोठया आशेने सुरु केली आहे.

या PMPL बस सेवेचा दूर प्रवाश्यांना तर फायदा होतच आहे परंतु लोणावळ्यापासून मुंढावरे या मधील प्रवाश्यांना नाहक त्रास होत असल्याचे प्रवाश्यांकडून सांगण्यात येत आहे.

तिकिटांचे दर व स्थानक स्थिर नसल्यामुळे याचा दूरच्या प्रवाशांना काहीच फरक पडत नसून जवळचे प्रवासी व शाळकरी विध्यार्थ्यांना याचा मनस्ताप होत आहे.

वलवण, वरसोली, वाकसई, कार्ला, शिलाटणे, फांगणे, मुंढावरे पर्यंतचे नागरिक व विध्यार्थी हे मोठया उत्सुकतेने या बस सेवेचा लाभ घेत आहे परंतु यांचे तिकीट दर स्थिर नसतात तर याठिकाणचे स्थानक ही स्थिर नसतात.कधी वाकसई ची तिकीट काढले की खडी मशीन 11 रुपये अशी तिकीट देतात तर कधी वाकसई ची 11 रुपयांची तिकीट देतात तर कधी कधी वाकसई हा स्टॉप नसून वाकसई साठी सुरज ढाबा 16 रुपये अशी तिकीट देतात प्रवाशांनी वाकसईची तिकीट मागितली तर सुरज ढाबा किंवा खडी मशीन अशी तिकीट देतात या दोन्ही स्थानकांच्या तिकीट दरामध्ये पाच रुपये अंतर असून या दोन्ही स्थानकांचे वाकसई येथील अंतर दहा मिनिटांवर आहे अशा प्रकारे पुढील स्थानकावर ही यांचा असाच सावळा गोंधळ सुरु आहे.

अशा परिस्थिती ते लहान शालेय विद्यार्थी कसे प्रवास करणार? कंडक्टर आपल्या मनाप्रमाणे कुठेही लहान विध्यार्थ्यांना उतरावत असल्याने हे बेजबाबदारीचे नाही का?

असा यांचा मनमानी कारभार सुरु असून यांच्या प्रशासनाला अत्ताच जाब विचारणे गरजेचे आहे अशी मागणी PMPL बसचे प्रवासी करत आहेत.

या बसमधील प्रवाशांमध्ये शोशल डिस्टंसिंग तर दूरच तोंडाला मास्क देखील नसते याकडे ही PMPL प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.लवकरच याकडे लक्ष घातले नाही तर नागरिकांना याचा आणखी मनस्ताप वाढेल अशी मागणी शालेय विध्यार्थी व काही जेष्ठ नागरिकांकडून करण्यात येत आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page