Thursday, April 25, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा नगरपरिषदेची वॉर्ड रचना लीक झाल्याची चर्चा...

लोणावळा नगरपरिषदेची वॉर्ड रचना लीक झाल्याची चर्चा…

लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेची निवडणूक येत्या काही दिवसात होणार आहे. तारीख अद्याप स्पष्ट झालेली नसली तरी त्या पूर्वी वॉर्ड रचना जाहीर करून त्यावर हरकती मागवल्या जाणार आहेत.

पण सध्या गुप्त असलेली लोणावळ्यातील वॉर्ड रचना लोकांमध्ये लिक झाल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.काही इच्छुक उमेदवारांनी लीक झालेल्या वॉर्ड प्रमाणे कामे सुद्धा चालू केली आहेत.

सध्या चर्चेत असणारी वॉर्ड रचना उदाहरण म्हणून 1) इंद्रायणी नगर,हुडको, टेबल लँड, कैलाश नगर, निसर्ग नगरी, इराणी चाळ (पोलीस स्टेशन समोर)२)ठोंबरे वाडी, रामनगर, भुशी गांव, हनुमान टेकडी, ३ चा प्रभाग होणार.३) गावठाण, खोंडगे वाडी, रायवूड, जुना खंडाळा, ४) मार्कर मंजिल, डी वॉर्ड, जुना बाजार, नवा बाजार, इराणी चाळ, रोहिदास वाडा, सिध्दार्थ नगर, अण्णाभाऊ साठे वसाहत, अशी संपूर्ण लोणावळ्याची वॉर्ड रचना लीक झाली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु असून काही इच्छुक उमेदवारांनी त्यानुसार आपापल्या प्रभागात कार्यक्रम सुरु केले आहेत तर काही इच्छुक उमेदवार वॉर्ड रचना जाहीर होण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या लोणावळा नगरवासियांमध्ये सुरु असलेली वॉर्ड रचना लीक झालेली असल्याचे नागरिकांमध्ये तर्क वितर्क सुरु आहेत.आणि खरोखर ही वॉर्ड रचना लीक झाली असेल तर निवडणूक आयोग याची दखल घेणार का? असा प्रश्न लोणावळ्यातील इच्छुक उमेदवार आणि सर्व नागरिकांमध्ये पडला आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page