Friday, March 29, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा नगरपरिषद आयोजित स्लो सायकलिंग स्पर्धेत प्रिन्स बैठा तर मुलींमध्ये सानिया बरनवाल...

लोणावळा नगरपरिषद आयोजित स्लो सायकलिंग स्पर्धेत प्रिन्स बैठा तर मुलींमध्ये सानिया बरनवाल प्रथम..

लोणावळा : लोणावळा नगरपरिषद आयोजीत माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत “स्‍लो सायकल स्‍पर्धा 2022″ चे आयोजन वलवण येथे करण्यात आले होते.

लोणावळा नगरपरिषदेने माझी वसुंधरा अभियान 2.0 मधील वायू या घटकाखाली शहरातील हवेमधील प्रदुषण कमी करण्याकरीता सायकलचा जास्‍तीत जास्‍त वापर नागरिकांनी करावा याबाबतची जनजागृती मोहीमेतंर्गत शालेय विध्यार्थ्यांकरिता “स्‍लो सायकल स्‍पर्धा” चे आयोजन केले होते. या स्‍पर्धेचे उदघाटन मा.उच्‍च न्‍यायालयाने गठीत केलेल्‍या तज्ञ समितीचे अध्‍यक्ष मा.डॉ.राधाकृष्‍णन यांच्या शुभहस्‍ते सायकलचा झेंडा फडकावून करण्‍यात आले.

या स्पर्धेत अनेक विध्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता.सहभागी सर्व विध्यार्थ्यांना डॉ. राधाकृष्णन यांनी मार्गदर्शन केले व सर्वानी जास्‍तीत जास्‍त सायकलचा वापर करावा याबाबत आवाहन केले.

यावेळी लोणावळा नगरपरिषदेचे मुख्‍याधिकारी मा.श्री. सोमनाथ जाधव यांनी शहरात विविध ठिकाणी सायकल ट्रॅक तयार केलेले आहेत याचा नागरिकांनी वापर करावा असे आवाहन करून उपस्थित सर्व विध्यार्थ्यांना शुभेच्‍छा दिल्‍या.

या सायकल स्‍पर्धेत शहरातील सर्व शाळांतील एकूण 130 विध्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला असता इ.8 वी ते 10 वीचे मुले व मुली या दोन गटात ही स्‍पर्धा घेण्‍यात आली.

यामध्‍ये मुलांमध्‍ये प्रथम क्रमांक प्रिन्‍स मेहीलाल बैठा (ऍड.बापूसाहेब भोंडे शाळा,भांगरवाडी), द्वितीय क्रमांक सुहान प्रविण देसाई (डॉन बॉस्‍को हायस्‍कूल, तुंगार्ली) व तृतीय क्रमांक भावेश भोसले (ऍड.बापूसाहेब भोंडे शाळा,भांगरवाडी) तसेच मुलींमध्‍ये प्रथम ऍड.बापूसाहेब भोंडे शाळा,भांगरवाडी सानिया बरनवाल, तर द्वितीय क्रमांक संस्‍कृती मापारी व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक नम्रता माने हिने मिळविले आहे.

याप्रसंगी माझी वसुंधरा शपथ घेवून बक्षिस समारंभ करण्‍यात आला. तसेच पारितोषीक पटकावलेल्‍या मुलांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. सर्वानी ही स्‍पर्धा आयोजीत केल्याबाबत तसेच स्‍वच्‍छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियानातंर्गत करत असलेल्‍या सर्व कामांबाबत लोणावळा नगरपरिषदेचे आभार मानले. नगरपरिषद स्‍वच्‍छता, पर्यावरण संवर्धन या करीता करत असलेल्‍या सर्व उपक्रमांना भरघोस सहकार्य कायम देण्याबाबत आश्‍वासन दिले.

याप्रसंगी लोणावळा नगरपरिषदेचे उपमुख्‍याधिकारी डॉ.भगवान खाडे, अधिकारी शरद कुलकर्णी, विजय भालेराव, सोनाली सासवडे, दत्‍तात्रय सुतार, प्रकाश सुर्यवंशी, विलास जाधव, अशोक दळवी, संजय कदम, राजेश सपकाळ, सचिन भालेराव, विजय लोणकर, अक्षय पाटील, प्रमोद श्रीवर्धनकर, बबन कांबळे, अनिल कुडले, टेमघरे, संतोष मालपुटे, सुनिल दहिभाते, विजय नायडू, मुकादम संतोष कारके, संजय जेधे, चेतन सारवान, हेमंत टेमघरे, वलवण विभागातील सफाई कर्मचारी उपस्थित होते. तसेच संकेत जाधव, कुणाल बोरकर यांनी विशेष सहकार्य केले.

- Advertisment -

You cannot copy content of this page