Friday, March 29, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा परिसरात कोरोनाच्या वाढत्या प्रभावाला राजकारण जबाबदार....

लोणावळा परिसरात कोरोनाच्या वाढत्या प्रभावाला राजकारण जबाबदार….

(लोणावळा शहर पत्रकार संघ) अध्यक्ष ऍडव्होकेट संजय पाटील ..

लॉक डाउनच्या सुरवातीच्या तीन महिन्यात लोणावळा नगरपरिषद आणि पोलीस प्रशासन हातात हात घालून काम करीत होते . लोणावळ्यात कोरोनाचा शिरकाव होऊ ह्यासाठी सातत्याने उपाययोजना राबविण्यात येत होत्या. याचा सर्व लोणावळेकरांना अभिमान होता . ह्या तीन महिन्याच्या काळात लोणावळा शहर हद्दीत एकही रूग्ण आढळला नव्हता . परंतू सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रेय घेण्याचे राजकारण सुरू झाले तेव्हा पासून मात्र लोणावळयात कोराना बाधीतांची संख्या झापाटयाने वाढतांना दिसत आहे .

गटातटाच्या राजकारणात मात्र लोणावळेकरांच्या सुखसुविधांकडे आणि सुरक्षेकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. सध्या सुरु असलेल्या गटातटाच्या चढावढीत माजी राज्यमंत्री बाळा भेगडे गट आणि विद्यमान आमदार सुनील शेळके गट ह्यांच्या रस्सीखेच मधील राजकारणात लोणावळेकर भरळले जात आहेत. त्यातच लोणावळ्यातील खाजगी रुग्णालयांचा मनमानी कारभार सुरु आहे. आधीच कोरोना लॉक डाऊन मुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडल्याने हाल अपेष्टा होत आहे. काम, उद्योग, रोजगार बंद असून मात्र अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली मेडिकल स्टोअर्स, दवाखाने, भाजी आणि किराणा व्यावसायिक यांच्याकडून सामान्य जनतेची अगदी सर्रासपणे लूट होताना दिसून येत आहे.

अत्यावश्यक इंडस्ट्रीजची मात्र भरभराट होताना दिसत आहे. लॉक डाऊनच्या सुरुवातीच्या तीन महिन्याच्या कालावधीत लोणावळा परिसरात एकही कोरोना रुग्ण आढळला नसून आता लोणावळ्यातील कोरोना बाधितांची संख्या 140 च्या पार गेली आहे. याला सर्वस्व राज्यकर्ते यांचे राजकारण जबाबदार आहे. तहान लागल्यावर विहीर खोदायची अशी परिस्थिती लोणावळा नगरपरिषदेच्या रुग्णालयाबाबत झाली असून आज जर मागील चार वर्षात ह्या रुग्णालयाचे काम पूर्ण होऊन हे रुग्णालय पूर्व पदावर सुरु झाले असते. तर खाजगी रुग्णालयाकडून लोणावळेकरांची लूट झाली नसती.

कोरोना संदर्भात हॉस्पिटलची सोय करणे ही नगरपरिषदेची जबाबदारी नाही असे म्हणण्याची अधिकाऱ्यांची हिम्मत झालीच नसती. शिवाय आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे त्यामुळे आता हॉस्पिटल आणि व्हॅनटीलेटर साठी नागरसेवकांनाच उपोषणास बसण्याची वेळ येत आहे यापेक्षा लोणावळेकरांचे दुर्भाग्य तरी काय ? सध्याच्या वेळेस राजकारण बाजूला ठेवून लोणावळ्याच्या हिताचे काय याचा विचार करणे गरजेचे आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page