Friday, April 19, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा येथील ॲड बापूसाहेब भोंडे विद्यालय आयोजित वक्तृत्व स्पर्धेत झारा हुजेफा व...

लोणावळा येथील ॲड बापूसाहेब भोंडे विद्यालय आयोजित वक्तृत्व स्पर्धेत झारा हुजेफा व सागर चौधरी प्रथम…

लोणावळा(प्रतिनिधी) : लोणावळा येथील स्व.ॲड.शंकरराव भोंडे विद्यालय आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.
विद्या निकेतन एज्युकेशन ट्रस्ट संचलित भोंडे हायस्कूलच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त या वर्षापासून सदर तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धेत मोठ्या गटात झारा हुजेफा तर लहान गटात सागर चौधरी यांनी प्रथम क्रमांक पटकावला .
यावेळी सर्व विजेत्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्रासह चषक देण्यात आले . सदर स्पर्धेत तालुक्यातील 15 शाळा या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या . ही स्पर्धा 5 वी ते 7वी व 8 वी ते 9 वी अशा दोन गटात घेण्यात आली .
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले कौशल्य विकसित व्हावीत हाच या स्पर्धेचा उद्देश असल्याचे संस्थेच्या सचिव राधिका भोंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले . तर अरविंद कुलकर्णी यांनी स्वर्गीय शंकरराव भोंडेंच्या आठवणींना उजाळा देत त्याच्या कार्याचा गौरव केला .
यावेळी संजय विद्वांस , अरविंद कुलकर्णी , सुनिल यादव , बी.जी.माने , संजीव वीर , आनंद नाईक यांनी या स्पर्धेचे परिक्षण केले . तसेच संस्थेचे अध्यक्ष ॲड . माधवराव भोंडे , सचिव राधिका भोंडे , दिलिप भोंडे , माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक अमोल साळवे , प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अंजुम शेख , माध्यमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका तृप्ती गव्हले , प्राथमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका स्मिता इंगळे , पर्यवेक्षिका माधवी थत्ते यांच्यासह पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते . भाग्यश्री पाटील व रिना वानखेडे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर नुतन घाणेकर यांनी आभार मानले .
तालुकास्तरीय विजेते पुढीलप्रमाणे – पहिला गट ( इ .5 वी ते 7 वी ) वक्तृत्व स्पर्धेचा प्रथम क्रमांक : सागर राधारमण चौधरी ( गुरुकुल इंग्लीश मिडीयम स्कूल लोणावळा ) द्वितिय क्रमांक : शर्वरी संजीव पायघन ( सरस्वती विद्या मंदीर , तळेगाव ) तृतीय क्रमांक : आदित्य अमित दळवी ( ॲड . बापूसाहेब भोंडे हायस्कूल , लोणावळा ) उत्तेजनार्थ : शौर्या दामोदर गदादे इशान दिपक तारे तर दुसरा गट ( इ .8 वी ते 10 वी ) प्रथम क्रमांक : झारा हुजेफा ( ॲड बापूसाहेब भोंडे हायस्कूल , लोणावळा ) द्वितीय क्रमांक : स्मृती मारूती आंबेकर ( परिज्ञानाश्रम विद्यालय , कार्ला ) तृतीय क्रमांक : हर्षदा रोहिदास गरूड ( गुरुकुल हायस्कुल , लोणावळा ) उत्तेजनार्थ : आयुष धनेश त्रिपाठी ( जैन इंग्लीश स्कूल , तळेगाव ) जान्हवी श्रावण महाजन ( प्रगती विद्या मंदीर , तळेगाव ) आदी विध्यार्थ्यांनी या वक्तृत्व स्पर्धेत आपली बाजी मारली आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page