Friday, March 29, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा रेल्वे गैरसोयी विरोधात सर्व पक्षांनी एकत्रित येण्याची गरज,, जितेंद्र कल्याणजी…

लोणावळा रेल्वे गैरसोयी विरोधात सर्व पक्षांनी एकत्रित येण्याची गरज,, जितेंद्र कल्याणजी…

लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळ्यातून रेल्वे संदर्भात शिक्षक, विध्यार्थी तसेच कर्मचारी आणि इतर प्रवासी यांची लोकल सेवेपासून गैरसोय होत आहे, तसेच लांब पल्याच्या एक्सप्रेस गाड्यांचा लोणावळा स्टेशन वरील थांबा पूर्ववत व्हावा यासाठी सर्व राजकीय पक्ष, संघटना व नागरिकांनी एकत्र येऊन यासाठी प्रयत्न करावे अशी अपेक्षा जितेंद्र धीरूभाई कल्याणजी यांनी अष्ट दिशा न्यूज प्रतिनिधीकडे व्यक्त केली आहे.
पकोरोना काळात रेल्वे प्रशासनाने निर्बंध पाळण्यासाठी रेल्वे लोकल फेऱ्या कमी केल्या तसेच लांब पल्याच्या एक्सप्रेस गाड्यांचा लोणावळा थांबा बंद केला त्यानंतर सर्व पुर्ववत होत असतानाही लोणावळा रेल्वे सेवा मात्र अपुरीच आहे. यासाठी लोणावळ्यातील अनेक पक्ष, सामाजिक संघटना यांनी आपापल्या पद्धतीने लोणावळा रेल्वे प्रशासनास निवेदन दिलेले आहेत. परंतु आजपर्यंत त्यादृष्टीने लोणावळा रेल्वे प्रशासनाने काहीच केल्याचे दिसत नाही. त्यासाठी आता एकटे नाही तर सर्व पक्षाने व सर्व सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन मोर्चा अथवा निवेदन देण्यासाठी एकत्रित विचार करण्यासाठी एखादी बैठक आयोजित करावी असे मत जितेंद्र कल्याणजी यांनी व्यक्त केले आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की सर्व राजकीय पक्षाच्या सर्व अध्यक्ष हे आपापल्या पक्षाच्या माध्यमातून लोणावळा रेल्वे स्टेशन प्रशासनाला लोकल किंवा लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस ट्रेन संदर्भात निवेदन देत आहेत, परंतु रेल्वे प्रशासन यासाठी कुठलाही ठोस निर्णय घेताना दिसत नाही.जर सर्वपक्षांनी एकत्र येवून आपल्या लोणावळा शहरासाठी व लोकांच्या हितासाठी एक विचार केला तर नक्की शासनाला काहीना काहीतरी निर्णय घ्यावा लागेल अशी अपेक्षा व्यक्त करत, लोणावळ्यातील सर्व पक्ष प्रमुखांना, व महाविकास आघाडी आणि इतर संघटनांना विनंती करत सर्व पक्षाची मीटिंग बोलावून लोणावळ्यातील सर्व स्थानिक नागरिक,सर्व सामाजिक संस्था,व सर्व पक्षीय कार्यकर्ते एकत्र येऊन याबाबत रेल्वे प्रशासनाच्या विरोधात मोर्चा किंवा निवेदन द्यायची काय ती दिशा ठरवावी जेणेकरून शासनाकडून त्याची दखल घेतली जाईल आणि त्यामुळे विद्यार्थ्याचे किंवा नोकर चाकरमानी यांचे होणारे हाल काही प्रमाणात कमी होतील.
तरी कोणीतरी पुढाकार घेवून सर्वपक्षीय बैठक बोलावून काही लोकल सुरू करणे विषयी व एक्सप्रेस गाड्यांचा थांबा लोणावळा पूर्ववत करणे याबाबत लोक दबावातून मंजुरी करण्यासाठी प्रयत्न करावे आणि त्यासाठी सर्व पक्षीय बैठक व्हावी अशी अपेक्षा जितेंद्र धीरूभाई कल्याणजी (टेलर)यांनी अष्ट दिशा न्यूज प्रतिनिधीकडे व्यक्त केली आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page