Tuesday, March 19, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा रेल्वे समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे रेल्वे प्रशासनास निवेदन…

लोणावळा रेल्वे समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे रेल्वे प्रशासनास निवेदन…

लोणावळा (प्रतिनिधी): लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना लोणावळा रेल्वे स्थानकावर अधिकृत थांबा देणेबाबत तसेच कर्जत – पुणे डेपो शटल सेवा कार्यान्वित करावी तसेच नांगरगांव – भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे काम त्वरीत सुरु करणेबाबत लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस कडून रेल्वे प्रशासनास निवेदन देण्यात आले.
लोणावळा हे पुणे मुंबई मार्गावरील अत्यंत लोकप्रिय आणि सतत पर्यटकांनी गजबजलेले निसर्गरम्य शहर असून.पुणे मुंबई रेल्वे मार्गावरचे महत्त्वाचे स्थानक आहे. याठिकाणी अनेक परप्रांतीय नागरीक , कामगार व त्यांचे कुटुंबीय लोणावळा शहरामध्ये व ग्रामिण परिसरात स्थायिक झाले आहेत . गुजरात , राजस्थान , मध्यप्रदेश , बिहार , उत्तर प्रदेश आदि ठिकाणी जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना लोणावळा येथे अधिकृत हॉल्ट न देता तो टेक्नीकल हॉल्ट देण्यात आला होता .
लोणावळा आणि परिसरातील परप्रांतिय शेकडो प्रवासी पुणे पासुन तिकीट काढून लोणावळा येथे गाडी पकडत होते . परंतु लोणावळा येथील टेक्नीकल हॉल्ट रद्द करून तो खंडाळा येथे नेण्यात आला आहे . खंडाळा हे रेल्वे स्टेशन गावापासुन तसेच आसपासच्या ग्रामिण परिसरापासुन खुपच लांब आहे . ह्या मुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांचा प्रवास हा प्रवाशांसाठी खुपच गैरसोयीचा आणि त्रासदायक झालेला आहे . बायका , मुले , वृद्ध तसेच दिव्यांग व्यक्ती आणि सामानसुमान घेऊन पुणे – मुंबई महामार्गावरून खंडाळा स्टेशन पर्यंत पोहचणे खुपच त्रासदायक आणि खर्चिक आहे.
महामार्गावरील वाहतुक कोंडीमुळे खंडाळा येथे पोहचे पर्यंत गाडी सुटण्याचा धोका असतो त्यामुळे लोकलच्यादेखील फेऱ्या वाढवून लोकल फेऱ्या पुर्ववत करून दैनंदिन प्रवाशांना दिलासा द्यावा. लोणावळा येथुन कोटा – सवाईमाधोपुर – जयपुर कडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे . पुणे जयपुर एक्सप्रेस ही लांब पल्ल्याची गाडी आठवड्यातुन दोन दिवस असल्यामुळे या भागातील प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे . तरी सदरची पुणे जयपुर एक्सप्रेसच्या फेऱ्या वाढवून त्या दररोज कराव्यात,कर्जत – पुणे डेपो शटल सेवा पुन्हा सुरू करावी व सर्व प्रवाशांना दिलासा द्यावा तसेच भांगरवाडी रेल्वे गेट येथील वाहतूक कोंडीने स्थानिक हैराण झाले असून नियोजित उड्डाणंपुलाचे काम त्वरित मार्गी लावावे आणि स्थानिक हॉकर्स ना लायसन्स देण्यात यावे आदी मागण्यांची विनंती निवेदनामार्फत करण्यात आली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस लोणावळा शहराध्यक्ष विलास बडेकर, कार्याध्यक्ष रवि पोटफोडे,युवक अध्यक्ष विनोद होगले, अमोल गायकवाड, महिला शहराध्यक्षा उमा मेहता, प्रवक्ता फिरोज शेख, भरत हारपुडे, आरोही तळेगावकर, आदित्य पंचमुख, राजेश मेहता, पायगुडे, जाकीर खलिफा यांसह महिला कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page