Thursday, April 25, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा रेल्वे स्टेशनवर भारत गौरव एक्सप्रेस चे रेल्वे अधिकाऱ्यांकडून स्वागत…

लोणावळा रेल्वे स्टेशनवर भारत गौरव एक्सप्रेस चे रेल्वे अधिकाऱ्यांकडून स्वागत…

लोणावळा (प्रतिनिधी) : नव्याने सुरु करण्यात आलेल्या भारत गौरव रेल्वे एक्सप्रेसचे लोणावळा रेल्वे स्टेशन येथे रेल्वे अधिकाऱ्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले.
भारत गौरव एक्सप्रेस आज दुपारी 12:00 वा.च्या दरम्यान लोणावळा रेल्वे स्टेशनवर दाखल होताच हिरवा झेंडा दाखवून भारत गौरव या रेल्वे एक्सप्रेसचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.तर रेल्वे चालक यांना बी एस राजपूत यांच्या हस्ते गुलाब पुष्प देत स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी लोणावळा रेल्वे सुप्रिडेंट बी. एस. राजपूत, लोणावळा स्टेशन सीसीआय जोहन सूरी,डी के सिंघ, रणजित कुमार, टी सी सुनील कुंभार, प्रवीण भोसले तसेच लोणावळा रेल्वे स्टेशनचे सफाई सुपरवायझर प्रकाश गणेश भाले आदींसह इतर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page