Thursday, April 25, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा रेल्वे स्टेशन परिसरात आढळला बेवारस मृतदेह...

लोणावळा रेल्वे स्टेशन परिसरात आढळला बेवारस मृतदेह…

लोणावळा : रेल्वे स्टेशन परिसरातील झाडाच्या ओट्यावर आढळला एका वृद्ध इसमाचा मृतदेह, मृत इसमाची कोणतीही ओळख पटलेली नसून त्या संदर्भात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अकस्मित मयत रजि. नं.01/2022, भा.द.वी. कलम 174 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.

याबाबत लोणावळा रेल्वे ऑफिस येथील सफाई सुपरवायझर प्रकाश फाले यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात माहिती देताच पोलीस व नागरिकांच्या सहाय्याने सदर इसमास खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी तो मृत असल्याचे घोषित केले असता अकस्मित मयत रजि. नोंद करून मृतदेह शव विच्छेदण करण्यात आले आहे. त्याचा एम.एल.पी.एन. नं. 1/1/2022 असा आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार या मयत इसमाचे वय अंदाजे 65 ते 70 वर्ष आहे. त्याच्या डोक्यावर पांढरे व बारीक केस आहेत. याने अंगात निळ्या रंगाच्या चौकटी असलेला फुल हाताचा शर्ट व त्याच्या आत चॉकलेटी रंगाचा पांढऱ्या आडव्या रेषा असलेला स्वेटर आणि काळी नीळसर रंगाची पॅन्ट अशी मयताची माहिती आहे.

त्याची ओळख पटणारा कुठलाही पुरावा मिळालेला नाही. म्हणून सदर इसम हा कोणाच्या ओळखीचा असल्यास लोणावळा शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.पुढील तपास पोलीस नाईक अजीज मेस्त्री हे करत आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page