Saturday, April 20, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा रेल्वे स्टेशन प्रबंधक बी एस राजपूत यांच्या संकल्पनेतून डॉ बाबासाहेब आंबेडकर...

लोणावळा रेल्वे स्टेशन प्रबंधक बी एस राजपूत यांच्या संकल्पनेतून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्रवाशांना “तुळस”भेंट !

लोणावळा (प्रतिनिधी) :भारतीय संविधानाचे शिल्पकार ,
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त लोणावळा रेल्वे स्टेशन प्रबंधक, सेंट्रल रेल्वे मजदूर संघ व साई रिक्षा संघटनेच्या वतीने लोणावळा रेल्वे स्टेशन वर प्रवाशांचे स्वागत करून अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर्वप्रथम स्टेशन प्रबंधक कार्यालयात स्टेशन प्रबंधक बी एस राजपूत यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प हार अर्पण करण्यात आले. व सर्व कर्मचारी वर्गाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
तसेच साई रिक्षा स्टॅन्ड च्या वतीने देखील रेल्वे स्टेशन बाहेर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
जयंती चे औचित्य साधून लोणावळा रेल्वे स्टेशन प्रबंधक बी एस राजपूत यांच्या वतीने रिक्षा मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तुळशी चे रोप भेट स्वरूपात देऊन अनोखा उपक्रम राबविला.
यावेळी सेवा निवृत्त स्टेशन प्रबंधक आर पी सिंह , CYM एस के देशपांडे , टी आई (SE) रणजीत कुमार सिंह , COS विकास कुमार,बी.बी. हिरलेकर , डी. के.सिंह (टी आई घाट), गिरिजेश कुमार ,मुख्य आरोग्य निरीक्षक सतीश कुमार मीना , हेम सिंह मीणा , प्रकाश भाले आदि मान्यवर उपस्थित होते. तसेच विश्वास बनसोडे आणि मित्र परिवाराच्या वतीने सर्व उपस्थितांचे स्वागत केले.

तर साई रिक्षा स्टॅन्ड च्या सर्व सदस्यांनी रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांचे स्वागत केले, आणि सेंट्रल रेल्वे मजदूर संघ लोणावळा शाखेकडून ही अभिवादन करण्यात आले. खूप अनोख्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
यावेळी डॉ बाबासाहेब यांच्या पवित्र स्मुर्तीस कोटि कोटि अभिवादन करताना बी एस राजपूत यांनी बाबासाहेबांचे विचार निवेदित करताना ” बाबा साहेब ने कहा था की शिक्षा वो शेरनी का दूध है जो पियेगा वो दहाडेगा और जो नहीं पियेगा वो दूसरोंकी गुलामी करेगा “
- Advertisment -

You cannot copy content of this page