Thursday, March 28, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा शहरातील कोरोना रुग्णांची संख्या १८ वर ...डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह..

लोणावळा शहरातील कोरोना रुग्णांची संख्या १८ वर …डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह..

दि. 12 जुलै रोजी लोणावळ्यातील धक्कादायक घटना. शहरातील नामांकित कल्पतरू हॉस्पिटलच्या डॉक्टरला कोरोनाची लागण झाली असून सदर डॉक्टरवर घरातच उपचार सुरु आहेत.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर डॉक्टर कामशेत येथे रुग्णाच्या उपचारासाठी जात असत आणि तिथेच त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचा अंदाज संबंधीत डॉक्टरला आला असता दि. 11रोजी त्याचे swab तपासणीसाठी पाठविले व दि. 12रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

ह्या डॉक्टर संदर्भात लक्षात घेण्याची बाब अशी आहे की ह्याच्या कल्पतरू हॉस्पिटल मध्ये शहरातून व ग्रामीण भागातून अनेक रुग्ण उपचारासाठी येत असतात त्याचप्रमाणे आजपर्यंत कित्येक लोक याच्या संपर्कात आले आहेत यासंदर्भातील कुठलीही माहिती अजून मिळालेली नाही. त्यासंदर्भात नगरपरिषदेणे दक्षता घेणे गरजेचे आहे.

आजवर लोणावळ्यात दिवसभरात रेड झोन असलेल्या रायगड जिल्ह्यातील शंभर पेक्षा जास्त नागरिक उपचारासाठी लोणावळ्यातील हॉस्पिटलमध्ये येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. खंडाळा चेकपोस्टवर रायगड जिल्ह्यातील लोणावळ्यात उपचारासाठी येणाऱ्यांना अडविले असता त्यांना लोणावळ्यातील डॉक्टरनेच अपॉइंटमेंट दिली असल्याचे निदर्शनास येत आहे. रेड झोन मधील नागरिक उपचारासाठी लोणावळा शहरातील हॉस्पिटलमध्ये येत असून लोणावळ्यातील काही हॉस्पिटल मध्ये सेनेटायझर फवारणी होत नसल्याचे सूत्रांकडून समजले आहे.

शहरातील सर्व हॉस्पिटलमध्ये रोज एकदा सेनेटायझर फवारणी करणे गरजेचे आहे.लोणावळा नगरपरिषदेणे शहरातील सर्व प्रत्येक वार्ड व प्रभागातही सेनेटायझर फवारणी करणे तितकेच गरजेचे आहे. शहरातील कल्पतरू हॉस्पिटलच्या डॉक्टर च्या संपर्कात जे कोणी आले असेल त्याची माहिती घेऊन त्यांची तपासणी नगरपरिषदेणे करावी हे गरजेचे आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page