Thursday, March 28, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा शहरातील 44 कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न..

लोणावळा शहरातील 44 कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न..

लोणावळा दि.3: लोणावळा शहरातील 44 कोटींच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा आज माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महा अभियानांतर्गत लोणावळा शहरातील पांगोळी येथील 33.48 कोटी रुपयांची पाण्याची टाकी, लोणावळा नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात 2 कोटी रुपये खर्च करून बसविण्यात आलेल्या महामानवांच्या सामूहिक शिल्पाचे लोकार्पण व कैलासनगर येथील 8 कोटींच्या स्मशानभूमी इत्यादी 44 कोटींच्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी मार्गदर्शन करताना लोणावळा शहराचा गौरव करताना फडणवीस म्हणाले की नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे. लोणावळा शहराचे नाव देशपातळीवर पोहचविण्यात नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांचा मोलाचा वाटा आहे. यांनी पाच वर्ष प्रामाणिकपणे लोणावळा शहराची सेवा केली आहे. तसेच मी मुख्यमंत्री पदावर असताना लोणावळा शहरासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे व लोणावळा शहरात रोपवे साठी पाठपुरावा करून प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर एका ठिकाणी स्मशान भूमीच्या उदघाटन करण्यासाठी गेलो असता मला एका प्रेताला अग्नी द्यावी लागली होती म्हणून स्मशान भूमीच्या उदघाट्नासाठी जायला मला भीती वाटते असे ही फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.

सदर लोकार्पण सोहळ्यासाठी माजी आमदार बाळा भेगडे, भाजप चे रवींद्र भेगडे, गणेश भेगडे, लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष दिलीप दामोदरे, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, आर पी आय चे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या समवेत भाजप चे सर्व आजी माजी पदाधिकारी , लोणावळा नगरपरिषद अधिकारी,कर्मचारी आणि आर पी आय ( आठवले ) चे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच लोणावळा शहरातील नागरिक व महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page