if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
पुणे दि.2: शिरोली येथील ” निर्मिका फौंडेशन ” आयोजित सन्मान सोहळ्यात लोणावळ्यातील सक्षम युवती अविशा जाधव सुर्वे यांना “युवती भूषण ” पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आज खेड तालुक्यातील शिरोली येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात निर्मिका फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरिषभाई देखणे यांच्या हस्ते अविशा जाधव सुर्वे यांना हा पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.
लोणावळा शहरातील सक्षम महिला व मावळ तालुक्यातील पहिली महिला रिक्षा चालक अशी ओळख असणाऱ्या अविशा यांनी महिला सक्षमी करणाचे महत्व दाखवून दिल्याने त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना “युवती भूषण ” पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.