Friday, March 29, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळ्यात काळ्या काचा असणाऱ्या वाहनांचा राजरोसपणे वावर...कोणतीही कारवाई नाही..

लोणावळ्यात काळ्या काचा असणाऱ्या वाहनांचा राजरोसपणे वावर…कोणतीही कारवाई नाही..

लोणावळा : शहरात काळ्या काचा असलेल्या वाहनांचा राजरोसपणे वावर होताना दिसत आहे.यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही.

वाहनांच्या विंडस्क्रीन आणि खिडक्यांच्या काचांवर काळ्या फिल्म व अन्य रंगबिरंगी फिल्म लावलेल्या वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक विनय कारगावकर यांनी राज्य पोलिसांना दिले होते .

वाहनांच्या विंडस्क्रीन आणि खिडक्यांच्या काचेवर लावण्यात येणा – या फिल्म काढण्याबाबत अविषेक गोयंका यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती . त्या याचिकेची सुनावणी 24 एप्रिल 2012 रोजी करताना सर्वोच्च न्यायालयाने अशा काचांवरील फिल्म काढण्याचे आदेश दिले होते . त्यानुसार महाराष्ट्र राज्यात पोलीस महासंचालकांनी वाहनांच्या विंडस्क्रीन आणि खिडक्यांच्या काचांवर लावण्यात येणा – या काळ्या फिल्म काढून टाकण्याबाबत तसेच अशा वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार संपूर्ण राज्यात आत्तापर्यंत सर्वत्र कारवाई सुरु असून लोणावळा शहरात मात्र कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.

सात वर्षा नंतरही राज्यात काळ्या फिल्म लावलेली वाहने मोठया प्रमाणात आहेत. काळ्या फिल्म व काळ्या काचा लावलेली खाजगी, शासकीय व निमशासकीय वाहने आजही राजरोसपाणे रस्त्याने फिरतात मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. महत्वाच्या आणि अतिमहत्वाच्या व्यक्तींना सुरक्षेच्या कारणास्तव झेड आणि झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात आलेल्या वाहनांना सूट देण्यात आली आहे. केंद्रीय मोटार वाहन नियमांतून सूट देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने काही वाहनांना सवलत दिली आहे. त्या वाहनांव्यतिरिक्त अन्य वाहनांवर कारवाई करावी असे आदेश राज्यातील पोलिसांना देण्यात आले आहेत.

त्यानुसार लोणावळा शहर परिसरात काळ्या काचा असणाऱ्या वाहनांवर कारवाई होत नाही.लोणावळा शहर हे पर्यटन स्थळ असल्याने अनेक भागातून पर्यटक लोणावळा शहरात येत असतात, शहरात वाहतूक कोंडी होईपर्यंत पर्यटकांची गर्दी होत आहे, तसेच अनेक फरार आरोपी देखील लोणावळ्यात आश्रयासाठी येत असतात व त्यांना लोणावळा पोलिसांनी अटक केल्याच्या अनेक वार्ता प्रसिद्ध ही झाल्या आहेत.परंतु फरार आरोपी लोणावळ्यातच आश्रया साठी येण्या इतकी त्यांची मजल कशी होते ? हे गुन्हेगार या काळ्या व रंगीत काचेचा फायदा घेऊन तर शहरात दाखल होत नाही ना? याकडेही पोलीस प्रशासनाने लक्ष देने तेवढेच गरजेचे आहे.

लोणावळा शहरात इतर शहरांप्रमाणे विंडस्क्रीन आणि खिडक्यांच्या काचानवर काळ्या फिल्म व अन्य रंगबेरंगी फिल्म लावलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात येत नाही त्यामुळे इतर शहरातील काळ्या काचा असलेली वाहने लोणावळ्यातच मोठया प्रमाणात दाखल होत असल्याचे चित्र महामार्ग व शहरात दिसून येत आहे. अनेक फरार आरोपी याचा फायदा घेऊन शहरात आश्रयासाठी दाखल होत असल्याचा प्राथमिक अंदाज नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page