Friday, March 29, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळ्यात दिवसभरात 6697 बालकांचे पोलिओ लसीकरण...डॉ. इंद्रनील पाटील यांची माहिती !

लोणावळ्यात दिवसभरात 6697 बालकांचे पोलिओ लसीकरण…डॉ. इंद्रनील पाटील यांची माहिती !

लोणावळा : – संकेश्वर उप – जिल्हा रुग्णालय लोणावळा व लोणावळा नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने लोणावळा शहरात आज सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या वेळेत पल्स पोलिओ कार्यक्रम राबविण्यात आला .

सदर मोहिमेत 1 ते 5 वयोगटातील मुलांना लसीचा डोस देण्यात आला . या मोहिमेत लोणावळा शहरात 35 पोलिओ लसीकरण बूथ कार्यान्वित करण्यात आले होते . तसेच 2 मोबाईल व 3 ट्रान्झिट टीम्स चा समावेश होता . या कार्यक्रमासाठी लोणावळा उप जिल्हा रुग्णालयाच्या एकूण 110 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला . यामध्ये आरोग्य सेवक , सिस्टर , आशा सेविका , अंगणवाडी सेविका , नगरपरिषद कर्मचारी , वैद्यकीय अधिकारी , रुग्णवाहिका चालक इत्यादींचा समावेश होता .

आज लोणावळा शहरात 6697 ( 92.55 % ) बालकांना पोलिओ लस देण्यात आली. उर्वरित सर्व बालकांना रुग्णालयाचे कर्मचारी पुढील पाच दिवसांत घरो घरी भेट देऊन लस पाजनार आहेत व लोणावळा शहरातील 100 % बालकांना लसवंत करणार आहेत . अशी माहिती उपजिल्हा रुग्णालय लोणावळा वैद्यकीय अधीक्षक डॉ . इंद्रनील पाटील यांनी दिली आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page