Tuesday, April 16, 2024
Homeपुणेलोणावळालो.न.पा.च्या पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाची दुरावस्था !

लो.न.पा.च्या पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाची दुरावस्था !

पंडित जवाहरलाल नेहरू शाळेच्या आवारात मद्यपी आणि नशेडी तरुणांचा अड्डा.

लोणावळा नगरपरिषदेच्या पंडित नेहरू माध्यमिक विद्यालयाची दुरावस्था. 30 ते 35 वर्षांपूर्वीची मोडकळीस आलेली इमारत त्यात जवळ जवळ 550 विध्यार्थी घेत आहेत शिक्षण. या शाळेतील विध्यार्थ्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी नसल्याने गैरसोय होत आहे,इमारत जुनी असल्याने छताचे प्लास्टर खाली पडत आहे, त्यामुळे विध्यार्थ्यांना मोठा अपघात होऊ शकतो. पावसाळ्यात इमारतीचे छत व भिंतीमधून पाण्याचा झरा लागत असल्याने वर्गात तलाव साचत आहे.

शाळेला गेट नाही, त्यामुळे रात्रीच्या वेळी शाळेच्या आवारात मद्यपी व नशेडी तरुणांनी अय्याशीचा अड्डा बनविला असल्याने विद्या मंदिराचे पावित्र्य धोक्यात येत आहे. या शाळेतील गेट दुरुस्त करणे अथवा येथे रात्री एक सुरक्षा रक्षक नियोजीत करणे गरजेचे आहे.इंद्रायणी नदी काठची संरक्षण भिंत नगरपरिषदेने जे सी बी नदी मध्ये नेण्यासाठी तोडली असून ती भिंत कायम तुटलेलीच आहे त्यामुळे तेथून विषारी सर्प शाळेच्या आवारात मोठया प्रमाणात वावरताना दिसून येतात, तसेच इथे संवाद शाळा असल्याने दिव्यांग विध्यार्थी इथे शिक्षण घेत असताना आवारात खेळत असतात त्यांच्याही आरोग्याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देने गरजेचे आहे.

शाळेच्या मागच्या बाजूस असलेल्या विहिरीत घाणीचे साम्राज्य तयार झाले असून यामुळे आरोग्याला हानिकारक असणारे मच्छर व डास तयार झाले आहेत त्यामुळे सर्व विध्यार्थी व शिक्षकांच्या आरोग्याला ही धोका निर्माण होत आहे अशा परिस्थितीत गोर गरीब पालकांना विध्यार्थी शाळेत पाठविण्यासाठी भीती निर्माण होत आहे, मग या गरीब विध्यर्थ्यांनी शिक्षण घ्यायचे कुठे असा प्रश्न पालकांमध्ये निर्माण झाला आहे.

लोणावळा नगरपरिषदेच्या शाळांपैकी ही एक शाळा आहे. ही शाळा कन्या शाळा म्हणून नावाजलेली शाळा आहे. या शाळेमधून यापूर्वी अनेक विद्यार्थिनी शिक्षण घेऊन मोठया पदावर पोहचल्या आहेत.या शाळेमध्ये सध्या उर्दू माध्यमिक 400 विध्यार्थी तर मराठी माध्यमातील पटसंख्या ही 70 वरून 150 पर्यंत पोहचविण्यात येथील शिक्षकांचा मोठा वाटा आहे.
तसेच या शाळेत संवाद शाळा देखील आहे त्यामध्ये जवळ जवळ 40 ते 50 दिव्यांग विध्यार्थी शिक्षण घेत आहेत.या इमारतीच्या डागडुजीकडे मागील काही वर्षांपासून स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने पालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आमचे प्रतिनिधी काही कामास्तव शाळेत गेले असता तेथील दुरावस्था निदर्शनास आली आहे.

येथील विध्यार्थी पालकांशी संवाद साधला असता या ठिकाणी पाण्याची टाकी आहे परंतु तिला पाणी नाही, शाळेला मुख्य गेट नाही, या आवारात काही मध्यपी व नशेडी तरुण आपला अड्डा बनवून असतात, याकडेही कोणाचे लक्ष नाही.अशा परिस्थितीत त्या गरीब पालकांनी काय करावे पावसाळ्यात अक्षरशः शालेय मैदानात पाणी साचून तलाव तयार झालेले असते तरीही त्या पाण्यातून वाट काढत विध्यार्थी शाळेत दाखल होत असतात.

परंतु शाळेत आल्यानंतरही शाळेच्या मोडकळीस आलेल्या इमारती मध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाला आणखी धोका निर्माण होत आहे त्यामुळे सर्व पालकांमध्ये व विध्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी या शाळेबाबत प्रशासन गांभीर्याने लक्ष देणार का याकडे सर्व पालक व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page