Friday, April 19, 2024
Homeपुणेवडगाववडगांव मावळ एल.सी. बी.पथकाकडून एक गावठी पिस्टल दोन काडतूसांसह एकास अटक !

वडगांव मावळ एल.सी. बी.पथकाकडून एक गावठी पिस्टल दोन काडतूसांसह एकास अटक !

वडगांव मावळ : बेकायदेशीर हत्यार बाळगणाऱ्यास एक गावठी पिस्टल आणि दोन काडतूसांसह पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वडगांव शहरातून अटक केली.स्वप्नील किसन मुऱ्हे ( वय वर्ष 33, रा. सोमाटणे गाव, ता. मावळ, जि. पुणे ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या हददीमध्ये खूनाच्या गुन्ह्याचा समांतर तपासात व्यस्त असताना स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे यांना गोपनीय सूत्रांकडून बातमी मिळाली की, वडगांव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत वडगाव बाजार पेठेच्या रोडवर वडगांव न्यायालयच्या समोर रोडच्या बाजूला उभा असलेल्या इसमाकडे एक गावठी पिस्टल असुन त्याने अंगात मरुन रंगाचा शर्ट घातलेला आहे.

अशी गोपणीय माहीती मिळाल्याने सदर बातमीच्या वर्णनावरून स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी स्वप्नील किसन मुऱ्हे यास सापळा रचून मोठ्या शिताफीने ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्यांचेकडून विनापरवाना व बेकायदेशीर हेतुने कमरेला बाळगलेले 1 गावठी पिस्टल व मॅगझीन मध्ये 2 जिवंत काडतुस आणि मोटर सायकल असा एकुण किं.रु.40,400 /- ( चाळीस हजार चारशे रुपये) चा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर सदर आरोपीला पुढील कारवाईसाठी वडगांव मावळ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे, ASI शब्बीर पठाण, ASI हनुमंत पासलकर,हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत जाधव,पोलीस कॉन्स्टेबल प्राण येवले,महिला पोलीस हवा. सुरेखा लोंढे, महिला पोलीस नाईकनंदा कदम, महिला पोलीस कॉन्स्टेबल सुजाता कदम यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page