Friday, March 29, 2024
Homeपुणेवडगाववडगाव मावळ पोलिसांची कामगिरी,4 लाख 24 हजाराचा चोरीचा माल हस्तगत...दोघांना ...

वडगाव मावळ पोलिसांची कामगिरी,4 लाख 24 हजाराचा चोरीचा माल हस्तगत…दोघांना अटक !

वडगाव मावळ : मुंबई पुणे महामार्गावरील वडगाव फाट्यावर नाकाबंदी दरम्यान वडगाव मावळ पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान चोरीच्या मालाची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोवर कारवाई करत सुमारे 9 लाख 24 हजार 500 रुपयांच्या मुद्देमालासह दोन जणांना अटक केली आहे.

या कारवाईत महंमद अलिमुद्दीन सिद्धीकी ( वय 25 ) व एहसान अब्दुल लतिफ रायनी ( वय 24 ) दोघेही राहणार भायखळा, मुंबई मूळ राहणार उत्तर प्रदेश, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांनी चोरलेल्या 1हजार 415 नग ॲल्युमिनिअम आउटर ट्यूब व चोरीसाठी वापरलेला टेम्पो असा तब्बल 9 लाख 24 हजार 500 रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

वडगाव मावळ पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सोमवारी ( दि .28 ) रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास वडगाव फाटा येथे नाकाबंदी दरम्यान चाकण बाजुकडुन मुंबई बाजुकडे ॲल्युमिनिअम आऊटर टयुब घेवुन निघालेला टेम्पो क्रमांक ( MH 02 ER 9035 ) यातील मालासंदर्भात पोलिसांनी चौकशी केली असता , टेम्पो मधील महंमद अलीमुद्दीन सिध्दीकी व एहसान अब्दुल लतिफ रायनी या दोघांनी वाहनामधील मालाबाबत कोणतेही समाधानकारक माहिती दिली नाही,तसेच वाहनातील मालाची कोणतीही पावती त्यांच्याकडे नसल्याने पोलिसांना टेम्पोतील माल चोरीचा असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी टेम्पो चालक व सहचालक यांना टेम्पोसह पोलीस ठाण्यात नेऊन तपास केला असता . त्यांनी टेम्पोतील माल हा म्हाळुंगे एमआयडिसीतील कंपनी मधून चोरला असल्याचे सांगितले .

त्याबाबत वडगाव पोलिसांनी म्हाळुंगे पोलीस ठाण्यास संपर्क करून विचारणा केली असता त्यांनी सदरबाबत गुन्हा दाखल असल्याचे सांगितले आहे. समजताच वडगाव पोलिसांनी जप्त केलेला माल म्हाळुंगे पोलीस ठाण्याकडे रवाना करण्यात आला आहे.

वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास भोसले, पोलीस उपनिरीक्षक संतोष चामे, सहाय्यक फोजदार सुनील साळुंखे, पोलीस हवालदार श्रीशेल कंटोली, अमोल कसबेकर, अजित ननवरे, आशिष काळे, मनोज कदम, जावळे, भाऊसाहेब खाडे यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page