Friday, March 29, 2024
Homeपुणेवडगाववडगाव येथील माळीनगर व दिग्विजय कॉलनीचा सतत खंडित होणाऱ्या विजपुरवठ्याचा प्रश्न नगराध्यक्ष...

वडगाव येथील माळीनगर व दिग्विजय कॉलनीचा सतत खंडित होणाऱ्या विजपुरवठ्याचा प्रश्न नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या पाठपुराव्याने मार्गी लागणार…

वडगाव दि.17: वडगाव शहरातील माळीनगर व दिग्विजय कॉलनी येथील सतत खंडित होणारा वीज पुरवठ्याचा प्रश्न नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या पाठपुराव्याने मार्गी लागणार. माळीनगर चा पूर्ण परिसर व दिग्विजय कॉलनीचा काही भाग हा गेल्या अनेक वर्षांपासून कामशेत फिडरवर आहे. हा भाग वगळता संपूर्ण वडगाव परिसर सेप्रेट वडगाव फिडरवर आहे. कामशेत येथील फिडरवर कामशेत व ग्रामीण भाग असल्याने दरवर्षी पावसाळ्याच्या काळात वीज पुरवठा सतत खंडित होत असतो.


अनेक वर्षापासून येथील रहिवाशी हा प्रश्न सहन करीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर येथील रहिवाशांनी आमदार सुनिल अण्णा शेळके व नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या उपस्थितीत हा प्रश्न मांडला होता. त्यावर माननीय आमदार सुनील आण्णा शेळके यांनी मुख्य अभियंता श्री जाधव यांना आदेश देऊन संबंधित विषय मार्गी लावण्याच्या सूचना केल्या होत्या तसेच नगराध्यक्ष मयुर ढोरे यांना लक्ष घालण्यास सांगितले.


नगराध्यक्षांनी जागेवर जाऊन पाहणी करत असताना सहाय्यक अभियंता श्री दिवटे यांच्याकडे कामासंदर्भात वेळोवेळी चर्चा व पाठपुरावा केला असता भेगडे लॉन्स परिसरामधील काम थांबले असल्याची माहिती मिळाली. तेव्हा संबंधित स्थानिक लोकांशी चर्चा करून कामातील अडथळा दूर करण्यात यश आले व अनेक वर्षापासून थांबलेले काम चालू झाले असून येत्या पंधरा दिवसात माळीनगर व दिग्विजय कॉलनी परिसरातील खंडित वीज पुरवठ्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.


हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी मा नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी सतत पाठपुरावा करून स्थानिक अडचणी सोडवल्याने काम सुरू झाले आहे. या कामी बंडोपंत भेगडे यांनी चांगले सहकार्य केले. तसेच मुख्य अभियंता श्री जाधव व सहाय्यक अभियंता श्री दिवटे यांनी सदर कामासाठी ताबडतोब कार्यवाही सुरू केली आहे. सदर काम सुरू असताना नगराध्यक्ष मयूर ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे उपस्थित होते.खूप वर्षापासूनचे रखडलेले काम चालू झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

- Advertisment -

You cannot copy content of this page