Thursday, March 28, 2024
Homeपुणेवडगाववडगाव येथे सिद्धिविनायक ऑटोमोबाईल शोरूमचा उदघाटन समारंभ संपन्न...

वडगाव येथे सिद्धिविनायक ऑटोमोबाईल शोरूमचा उदघाटन समारंभ संपन्न…

वडगाव मावळ: वडगाव हद्दीत सिद्धिविनायक ऑटोमोबाइल शोरूम अँड सर्व्हिस सेंटर शाखा-२ चे भव्य उदघाटन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

वडगाव येथील पंचमुखी मारुती मंदिर वडगाव मावळ येथे या शोरूमचा उदघाट्न समारंभ प्रमुख पाहुणे व नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमास मुख्य उद्घाटक म्हणून मनसे मावळ तालुका अध्यक्ष रुपेशभाऊ म्हाळसकर तसेच मनसे नगरसेविका सायलीताई म्हाळसकर उपस्थित होत्या यावेळी ज्येष्ठत्वच्या नात्याने व खऱ्या अर्थाने ज्यांच्या कष्टातून आणि संस्कारातून या व्यवसायास मौलिक आशीर्वाद लाभले अशा सिद्धिविनायक ऑटो मोबाइलचे सर्वेसर्वा गोरख शिवराम मोहिते व मछिंद्र शिवराम मोहिते यांच्या मातोश्री तसेच आकाश गोरख मोहिते यांच्या आजी श्रीमती पारुबाई शिवराम मोहिते यांच्या शुभ हस्ते फित कापून शोरूम व सर्व्हिस सेंटरचे उदघाटन करण्यात आले.

तसेच रुपेश म्हाळसकर यांच्यावतीने शॉल व श्रीफळ देऊन मोहिते यांचा सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी उद्योजक चंद्रशेखर म्हाळसकर, रविंद्र म्हाळसकर गणेश गवारे, महेंद्र म्हाळसकर, सचिन कराळे, संतोष म्हाळसकर, काशिनाथ तोडकर,आशिष म्हाळसकर, लालसाहेब पवार, दिलीप बारवकर, सचिन सुतार आदिजण उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page