Friday, March 29, 2024
Homeपुणेवडगाववडगाव शहरातील महादेव मंदिर झगमगतय विद्युत कारंजाने...

वडगाव शहरातील महादेव मंदिर झगमगतय विद्युत कारंजाने…

वडगाव मावळ : वडगाव शहरातील महादेव मंदिर येथे असलेल्या विहिरीत आकर्षक रंगीबेरंगी कारंजे बसवील्याणे परिसर झगमगला आहे.

स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुधंरा 2.0 या अभियान अंतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम ब्रॅण्डिंग करण्याच्या अनुषंगाने वडगाव नगरपंचायत माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या स्चछता अभियानातील जल या तत्वानुसार आपल्या शहरात पुरातन काळापासून मध्यवर्ती ठिकाणी असलेली महादेव मंदिर येथील विहीर प्रदूषित असल्याकारणाने आणि सध्या हि विहीर वापरातही नसल्याने काही महिन्यापूर्वी या विहीरीची साफसफाई करून संरक्षक जाळी बसवीण्यात आली.

महादेव मंदिर परिसरात असलेल्या या पुरातन काळातील विहिरीत गेल्या तीन दिवसांपासून किटकनाशक फवारणी करणे, विहीर संरक्षक भिंतीवर रंगकाम करणे तसेच विहिरीत आकर्षक कारंजे बसविणे आदी काम आज पूर्ण करण्यात आले असून संपूर्ण परिसराचे लवकरच सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

आपले शहर स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभागी झाले असून शहरात मॉर्निंग तसेच नाईट वॉक दरम्यान फिरणाऱ्या नागरिकांना हा परिसर आकर्षीत करेल अशी अपेक्षा नगराध्यक्ष मयुर ढोरे, मुख्याधिकारी डॉ जयश्री काटकर, उपनगराध्यक्षा शारदा ढोरे, आरोग्य समिती सभापती राहुल ढोरे यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page