Friday, April 19, 2024
Homeपुणेवडगाववडगाव शहर मसने कडून डॉक्टरांचा सन्मान करून जागतिक डॉक्टर दिन साजरा...

वडगाव शहर मसने कडून डॉक्टरांचा सन्मान करून जागतिक डॉक्टर दिन साजरा…

वडगाव मावळ : जागतिक डॉक्टर्स – दिनानिमित्त वडगाव शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरातील सर्व डॉक्टरांना श्रीफळ व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला .

1 जुलै जागतिक डॉक्टर्स दिवस साजरा करण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सूचना दिल्या होत्या . त्यानुसार मनसे मावळ तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने शहरातील सर्व डॉक्टर्स यांना शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ व मिठाई देऊन सत्कार करून व शुभेच्छा देत जागतिक डॉक्टर्स दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

डॉक्टरांचे कौतुक करताना “कोरोनासारख्या अभूतपूर्व महामारीच्या काळात तसेच दैनंदिन जीवनात इतर आजारांवर रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांच्या कार्याला मनसेतर्फे सलाम व सदैव रुग्णांना सेवा देणाऱ्या या डॉक्टरांच्या कार्याची दखल मनसे नेहमी घेत राहील ” असे मत ओंकार भांगरे यांनी व्यक्त केले.

यावेळी वडगाव शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ओंकार भांगरे , अजय देडे , शुभम म्हाळसकर , पौरस डुकरे , दामोदर बनकर , दिनेश म्हाळसकर , रोहित कोळी , ओमकार चिमटे , आदित्य म्हाळसकर , प्रणव म्हाळसकर , संतोष छेत्री , श्रेयस दरेकर व अन्य मनसे सैनिक उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page