Friday, March 29, 2024
Homeपुणेवडगाववडगाव शाळांमध्ये लसीकरणाला सुरुवात..15 ते 18 वयोगटातील मुलांचे होणार लसीकरण...

वडगाव शाळांमध्ये लसीकरणाला सुरुवात..15 ते 18 वयोगटातील मुलांचे होणार लसीकरण…

वडगाव : वडगाव नगरपंचायत हद्दीतील 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला 3 जानेवारी पासून सुरुवात करण्यात आली आहे.

केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारच्या निर्देषानुसार तसेच आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव नगरपंचायत व आरोग्य उपकेंद्र यांच्या नियोजनातून वडगाव शहर हद्दीतील 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी शहरात 3 जानेवारीपासून कोव्हिड 19 लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागल्याने केंद्र व राज्य सरकारने १५ ते १८ वयोगटातील शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतल्याने वडगाव नगरपंचायत व आरोग्य उपकेंद्र यांच्या नियोजनातून शहरातील न्यू इंग्लिश स्कूल, रमेश कुमार सहानी इंग्लिश मीडियम स्कूल, पोतदार इंग्लिश मीडियम स्कूल, ईडन इंटरनँशनल स्कूल कातवी या शाळांमध्ये चार स्वतंत्र लसीकरण केंद्र उभारण्यात आली असून एका दिवशी एकाच शाळेत सकाळी 10 ते दुपारी 2 यावेळेत विदयार्थ्यांना लसीकरण करून घेता येईल अशी माहिती तालुका आरोग्य समन्वयक गुणेश बुगडे, नगराध्यक्ष मयुर ढोरे, मुख्याधिकारी डॉ जयश्री काटकर, डॉ स्मिता पालवे यांनी दिली आहे.

आज रमेशकुमार सहानी इंग्लिश मिडीयम स्कूल आवारात लसीकरणास सुरुवात करण्यात आली यावेळी नगराध्यक्ष मयुर ढोरे, डॉ. स्मिता पालवे, शाळेचे संस्थापक राजेंद्र म्हाळसकर, नंदकुमार ढोरे, सचिन ढोरे आणि आरोग्य सेविका, शिक्षक उपस्थित होते.

१५ वर्षापुढील मुलांचे लसीकरण होत असताना शहरातील या चारही केंद्रात नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या माध्यमातून नर्सेस लसीकरणासाठी उपलब्ध असणार आहेत.

लसीकरणास पात्र लाभार्थ्यांनी शाळेतील लसीकरण केंद्रावर स्वत:चे आधारकार्डचे झेरॉक्स, पालकांचे संमतीपत्र सुद्धा असणे आवश्यक आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page