Friday, March 29, 2024
Homeपुणेलोणावळावरसोली टोल नाका येथे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई..

वरसोली टोल नाका येथे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई..

लोणावळा (प्रतिनिधी):लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून मुंबई पुणे महामार्ग वरसोली टोल नाका येथे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर मोठी कारवाई करण्यात आली. यामध्ये आज पन्नास जणांवर कारवाई करत तब्बल 38 हजार तीनशे रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
महामार्गावरून अनेक दुचाकी स्वार, चार चाकी चालक व अवजड वाहन चालक मद्य प्राशन करून वाहन चालवत असतात, तर अनेक दुचाकी वर ट्रिपल सीट वाहतूक सुरु असते तर काही बिना हेल्मेट प्रवास करून अपघाताला निमंत्रण देत असतात व वाहतुकीचे नियम मोडत असतात याला आळा घालण्यासाठी सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या नेतृत्वात मुंबई पुणे जुन्या महामार्गावर वरसोली टोल नाका येथे नाकाबंदी करण्यात आली होती.
त्यादरम्यान लहान मोठी 120 ते 130 वाहने चेक केली असता दरम्यानच्या काळात ड्रँक अँड ड्राईव्ह च्या 2 केस, अवैध वाहतूक ची 1 केस तर पो. नॉ. कॉ. प्रमाणे भा द वी कलम 283,290 प्रमाणे 8 केस आणि इतर केसेस 39 अशा एकूण 50 जणांविरोधात कारवाई करत एकूण 38300/ रु. चा दंड वसुल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक निलेश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस कारंडे, पोलीस हवालदार विजय मुंडे, पोलीस हवालदार सकपाळ,पोलीस नाईक कदम, पोलिस नाईक गणेश होळकर, पोलीस अंमलदार विनोद गवळी, पोलीस अंमलदार खैरे, पोलीस अंमलदार कमठणकर आदींनी केली.
- Advertisment -

You cannot copy content of this page