Friday, March 29, 2024
Homeपुणेमुळशीवाळंज विद्यालयात आरोग्य शिबीर संपन्न..

वाळंज विद्यालयात आरोग्य शिबीर संपन्न..

मुळशी जेष्ठ समाजसेवक कोराईगड शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष,नंदकुमार वाळंज यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समवेदना पुणे येथील संस्थेतर्फे 30 ते 60 वयोगटातील महिलांची कर्करोग पूर्व निदान तपासणी कार्यक्रम पार पडला.स्त्रियांमध्ये स्तनाच्या व गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण खूप वाढते आहे. अशा परिस्थितीमध्ये कर्करोगाची पूर्वनिदान तपासणी केल्यास व वेळीच निदान झाल्यास जीव खर्च वाचविला जाऊ शकतो. याचमुळे कर्करोगाचे निदान प्राथमिक किंवा कर्करोग पूर्व अवस्थेत करावे, यासाठी समवेदना सन २००९ पासून30 कर्करोग पूर्व निदान तपासणी उपक्रम राबवित असून आज पर्यंत, १८००० अधिक महिलांच्या तपासणीचे कार्य केले आहे.

या उपक्रमांतर्गत 30 ते 60 वर्ष वयोगटातील स्त्रियांच्या पुढील तपासण्या मोफत करण्यात येतात. iBE स्तनाची विशेष तपासणीVIA गर्भाशय मुखाची विशेष तपासणी करण्यात आली.


याप्रसंगी समवेदना संस्थेचे डॉ. साधना देवाल, डॉ. श्रेया गोसावी, डॉ. रेश्मा रासकर, डॉ. दिपक मोरे, माधवी देऊस्कर श्रीकांत वायकर,माधवी राऊत टेक्निसीयन, सुहास मोरे डॉ. साळुंखे सर प्रा. आरोग्य केंद्र आंबवणे एम्बी व्हॅली चे डॉ. योगेश फुले, जाकीर सय्यद, दिपक कंधारे, यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबीर संपन्न झाले.


प्रथम मान्यवरांचे श्री. योगेश वाळंज अध्यक्ष, शिक्षक पालक संघ, श्री नवनाथ दळवी अध्यक्ष आरोग्य समिती श्री भटू देवरे मुख्याध्यापक यांच्या हस्ते मानवरांचा यथोचित सत्कार करण्यात आले.डॉ. योगेश फुले यांनी मार्गदर्शन केले.


शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कर्क रोगाच्या तपासणी साठी बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.या प्रसंगी जि. प. केंद्र शाळेचे मुख्याध्यापक श्री धोत्रे सर व श्री. गेंगजे सर, अंगणवाडी सेविका ज्योत्स्ना कुलथे,आशा सेविका आशाताई मोढवे उपस्थित होत्या.


समवेदना संस्थेचे समन्व्यक अबोली खोंडे व मनोहर कलुंजे व विद्यालयाचे शिक्षक,कर्मचारी यांनी शिबीर यशस्वी केले.मा. नंदकुमार वाळंज यांच्या वतीने मुख्याध्यापक श्री. देवरे यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले श्री संजय कुलथे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

- Advertisment -

You cannot copy content of this page