Friday, March 29, 2024
Homeपुणेमुळशीविद्यार्थ्यानी नेहमी सकारात्मक विचार करावा यश निश्चित मिळेल , हरिश्चन्द्र गडसिंग..

विद्यार्थ्यानी नेहमी सकारात्मक विचार करावा यश निश्चित मिळेल , हरिश्चन्द्र गडसिंग..

कोराईगड शिक्षण संस्था संचालित सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ पार पडला . हरिश्चन्द्र गडसींग गणित तज्ञ व निवृत्त परिवहन अधिकारी पुणे. बिपीन देसाई उद्योजक, नंदकुमार वाळंज संस्थापक अध्यक्ष कोराईगड शिक्षण संस्था , विनय विद्वास संस्था उपाध्यक्ष,, वत्सलाताई वाळंज मा. आदर्श सरपंच आंबवणे व मा. अध्यक्ष लायन क्लब लोणावळा. किसन गोरे सचिव,, किशोर आखाडे मार्गर्शक, , संजय गायकवाड मा.नगरसेवक लोणावळा. किसनमामा कालेकर संस्था सदस्य , सुनील प्रधान उद्योजक , यशवन्त माताळे , गोरक्ष मेहता मा. उपसरपंच आंबवणे, सागर वाळंज हे प्रमुख पाहुणे लाभले. याप्रसंगी पाहुण्याच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करून सरस्वती पूजन केले.
विध्यार्थीनीनि ईश स्तवन व स्वागत गीतातून पाहुण्यांचे स्वागत केले. सर्व पाहुण्याचा यथोचित सन्मान करण्यात आला. विद्यार्थी मनोगत मुख्याध्यापक देवरे बी जी यांनी चालू शैक्षणिक वर्षाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचा हेतू विषद केला व पाहुण्याची ओळख करून दिली. या प्रसंगी विद्यालयाचा “वात्सल्य” वार्षिक अहवाल अंक २२ चे प्रमुख पाहुण्याच्या हस्ते प्रकाशन केले. मा हरिश्चन्द्र गडसिंग मार्गदर्शन पर भाषणात म्हणाले की,विद्यार्थ्यानो बदल हा माणसाच्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे.हाच बदल माणसाला विद्वान बनवतो आणि प्रगतीकडे नेतो.

संपर्क संस्था भांबर्डे, आंबवणे येथील मागील वर्षी10 वी उत्तीर्ण झालेल्या प्रथम तीन विध्यार्थी चे ट्रॉफी शॉल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या ह्स्तेगौरव केला. वर्षांतील विविध उपक्रमात प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. चालू वर्षातील आदर्श विद्यार्थी अनुराग मोरे व आदर्श विद्यार्थिनी अपूर्वा जाधव यांना सर्व मान्यवरांनी गौरविले.प्रसंगी ,गणेश दळवी पोलीस पाटील आंबवणे ,गणेश वाळंज तंटामुक्ती अध्यक्ष, नारायण दळवी अद्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती ,उल्हास मानकर उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती , नवनाथ दळवी अध्यक्ष आरोग्य समिती ,मनोज गवळी बाल आशा घर, चंद्रकांत कालेकर गेंगजे सर मुख्याध्यापक जि.प केंद्र शाळा आंबवणे, योगेश वाळंज अध्यक्ष, शि. पा. संग. विनायक तोंडे मा. अध्यक्ष जि. प शा. व्य. समिति, सोपान दळवी अध्यक्ष शालेय पोषण आहार समिती मनोज जंगम , राजूभाऊ तोंडे, तसेच माजी विद्यार्थी व पालक पंचक्रोशीतील ग्रामस्थ मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे आधारस्तभ मा. श्री. मिलिंद दादा वाळंज उद्योजक व कॅनरी आयरल्यांड चे मालक यांचे सहकार्य लाभले.विद्यालयातील रवींद्र सोनवणे, बाळासाहेब खेडकर, राहुल आवळे ,विजय दळवी, शालिनी देवरे , संतोष दळवी , महादेव खेडकर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली. किसन गोरे यांनी आभार मानले.विद्यार्थ्यानी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण कले. संजय कुलथे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page