Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडवैजनाथ देवस्थान जमीन घोटाळा प्रकरण चौकशीसाठी भाजपचे कर्जतमध्ये धरणे आंदोलन !

वैजनाथ देवस्थान जमीन घोटाळा प्रकरण चौकशीसाठी भाजपचे कर्जतमध्ये धरणे आंदोलन !

माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली चौकशीची मागणी..

भिसेगाव- कर्जत(सुभाष सोनावणे )” जमीन आमच्या देवाची ,नाही कुणाच्या बापाची ……भ्रष्टाचारी सरकारचा निषेध असो ……वैजनाथ जमीन घोटाळा प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे ……..किरीट सोमय्या साहेब तुम आगे बढो , हम तुम्हारे साथ है …….” या गगनभेदी आरोळ्या आज कर्जत तालुक्यातील वैजनाथ देवस्थान जमीन खरेदी – विक्री प्रकरणाची चौकशी होऊन संबंधित ती जागा खरेदी करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली किरवली ” डी मार्ट ” समोर धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात आली.यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कर्जत तालुक्यातील सुमारे ३०० वर्षे पेक्षा अधिक पुरातन श्री शिवशंकर वैजनाथ देवस्थान ची जमीन हस्तांतरण होताना संबंधित योग्य परवानग्या न घेता अहिंदू ” सलीम बिलाखीया ” या व्यक्तीच्या नावे होऊन , ती जागा लगेच अल्पावधित राजकीय व्यक्तींनी विकत घेतली , या व्यवहारात घोटाळा झाला असून त्याची चौकशी व्हावी , यासाठी आज शुक्रवार दि . २८ जानेवारी २०२२ रोजी भाजप नेते माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली ११ वा . डी मार्ट समोर – किरवली या ठिकाणी तीव्र निदर्शने करण्यात आली , तसेच धरणे आंदोलन ही करण्यात आले.
यावेळी ” जमीन आमच्या देवाची , नाही कुणाच्या बापाची ” , वैजनाथ जमिन घोटाळा चौकशी , झालीच पाहिजे ,अश्या घोषणा देण्यात आल्या व ह्या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी , असे निवेदन कर्जत तहसीलदार विक्रम देशमुख यांना देण्यात आले.
यावेळी भाजपा कर्जत तालुका अध्यक्ष तथा नेरळ ग्रामपंचायत उपसरपंच मंगेश म्हसकर , जिल्हा सरचिटणीस दिपक बेहेरे , किसान मोर्चा कोकण संपर्क प्रमुख सुनील गोगटे , जिल्हा चिटणीस रमेश मुंढे , कर्जत तालुका सरचिटणीस संजय कराळे ,युवा मोर्चा अध्यक्ष प्रमोद पाटील , कर्जत शहर अध्यक्ष बळवंत घुमरे , सचिन म्हसकर , महिला मोर्चाच्या कर्जत ता.अध्यक्षा स्नेहा गोगटे , कर्जत नगर परिषदेच्या नगरसेविका स्वामिनी मांजरे , सरस्वती चौधरी , बिनिता घुमरे , ऍड . गायत्री परांजपे , भगवान अहिनकर , विजय जिनगरे , ऍड . ऋषिकेश जोशी , सुषमा ढाकणे , संदेश कराळे, मिनेश मसणे, केशव तरे , मयूर शितोळे , विजय कुलकर्णी , प्रभाकर पवार , अंकुश मुने , सर्वेश गोगटे त्याचप्रमाणे भाजप चे अनेक पदाधिकारी , कार्यकर्ते , महिला वर्ग आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page