Friday, March 29, 2024
Homeपुणेलोणावळावैद्य धनंजय जोरी यांचे आयुर्वेदिक चिकित्सा व पंचकर्म केंद्र लोणावळ्यात नागरिकांच्या सेवेसाठी...

वैद्य धनंजय जोरी यांचे आयुर्वेदिक चिकित्सा व पंचकर्म केंद्र लोणावळ्यात नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर…

लोणावळा : शहरात वैद्य धनंजय जोरी यांच्या
आयुर्वेद चिकित्सा व पंचकर्म केंद्राचा भव्य दिव्य उदघाटन सोहळा संपन्न झाला.

लोणावळा शहरातील बापूसाहेब भोंडे हायस्कूल व व्हीपीएस ज्युनिअर कॉलेजचे माजी विद्यार्थी तसेच आयुर्वेद आणि आयुर्वेदिक चिकित्सा आणि उपचार पद्धतीवर प्रचंड निष्ठा श्रद्धा विश्वास असणारे वैद्य धनंजय जोरी यांनी महाशिवरात्रीच्या शुभप्रसंगी संकल्प कलशपूजन करुन रविवार दि.13 मार्च रोजी लोणावळ्यातील भांगरवाडी येथील शाखेचा उदघाटन सोहळा शहरातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झोकात पार पडला. यापूर्वी तळेगाव येथील पहिल्या शाखेचे उदघाटन होऊन नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर आहे.

पुणे येथील प्रथितयश वैद्य हरिश्चंद्र पाटणकर यांनी प्रथापरंपरानुकूल भगवान धन्वन्तरी आणि खलपूजनाने विधिवत शुभारंभ केला. प्राचिन भारतीय आयुर्वेदिय उपचार पद्धतीचे महत्व आणि भविष्यातील आव्हाने व अपेक्षा विषद करीत पाटणकरांनी धनंजय यांस भावशुभेच्छा प्रदान केल्या.

सदर आयुर्वेद चिकित्सा व पंचकर्म केंद्रात सुवर्णप्राशन संस्कार, त्वचा व केश विकार, उंचीवर्धन व स्थौल्यचिकित्सा, पंचकर्म आणि बालकांपासून वृद्धांपर्यंत व्यक्तींच्या विविध व्याधींवर समाधानकारक आयुर्वेदिक उपचार इ. सुविधा देणार असल्याचे वैद्य धनंजय यांनी सांगीतले.

याप्रसंगी जोरी व चव्हाण परिवाराचे स्नेही सहकारी हितचिंतक शुभचिंतक मित्रपरिवार नातेसबंधी यांनी शुभेच्छा देण्यासाठी दाटी केली होती. शहरातील अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन कौतुक करीत शुभाशीर्वाद दिले.

प्रमुख्याने जेष्ठ समाजसेवक धीरुभाई कल्याणजी व नंदकुमार वाळंज ( बाबूजी ), जेष्ठ मार्गदर्शक विनय विद्वांस, वसंत व्याख्यानमाला समिती अध्यक्ष संजय गायकवाड, नगरसेवक दत्तात्रय येवले, विद्यमान नगरसेवक निखिल कवीश्वर,आरोही तळेगावकर, मा. शिक्षण मंडळ सभापती जीतेंद्र कल्याणजी, हेल्प सिस्टर्स सदस्या कांचन लुणावत व डॉ. सर्जेराव गिरवले, पत्रकार प्रतिनिधी संपादक गणेश गवळी इत्यादी मान्यवरांनी स्नेहगाठ (रिबन) उलगडून विविध सुविधा कक्षांचे उद्घाटन केले.

यानिमित्ताने मान्यवर मा. माधव भोंडे, मा.अजित घमंडे, मा.भगवान आंबेकर, मा. कन्हैया भुरट, मा. मुकुंद खिरे, स्काऊट गाईड गिल्ड अध्यक्ष अशोक घाडगे, सरपंच संदिप उंबरे, राजेश गायकवाड, महेश केदारी, प्रा. डॉ. नामदेव चौधरी यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा व्यक्त केल्या.

वैद्य धनंजय जोरी हे व्हीपीएस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चे सेवानिवृत्त प्राचार्य विजयकुमार जोरी यांचे धाकले चिरंजीव असून त्यांनी डी. वाय. पाटील कॉलेज पुणे येथून बी.ए.एम.एस.पदवी संपादन केली आहे. आयुर्वेदाचार्य वैद्य अभिजित शिरकांडे व अंकिता शिरकांडे (पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली गेली सुमारे पाच वर्षांपासून आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा प्रचार, प्रसार तथा लोकसेवा डॉ. धनंजय करीत आहेत. त्यांनी कोविड महामारी प्रसंगात प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे व औंध हॉस्पिटल पुणे येथे कोरोना योद्धा म्हणून कौतुकास्पद कामगिरी केली आहे.


जानेवारी 2021 पासून तळेगाव दाभाडे येथे आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र सूरु करुन परिसरात यशस्वी वाटचाल करीत नावलौकिक मिळवला आहे. त्यांच्या या सेवाभावी सेवेबद्दल विशेष कौतुक होत आहे. 16 वर्षांपर्यंतच्या बालक व किशोरवयीन मुलांसाठी व्यापक स्वरुपात सुवर्णप्राशन संस्कार करणारे वैद्य म्हणूनही त्यांची ओळख आहे. याशिवाय बालक ते वृद्धांच्या विविध व्याधींवर ते यशस्वी उपचार करतात. व्याधीग्रस्त व्यक्तींना घरी भेट देऊन चिकित्सा, उपचार व समुपदेशनही करतात. लवकरच अद्ययावत साधनांद्वारे त्वचा व केश विकारांवरील प्रभावी खात्रीशीर उपचार सुरु करणार असल्याचे सूतोवाच डॉ. धनंजय यांनी केले.


कार्पोरेट लॉयर ऍडव्होकेट अक्षदा धनंजय जोरी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले व आभार व्यक्त केले.

- Advertisment -

You cannot copy content of this page