Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रशिक्षण विभागाच्या अधिका-याच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन..

शिक्षण विभागाच्या अधिका-याच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन..

नंदुरबार जिल्ह्यातील सुप्रसिद्ध शैक्षणिक संस्था अँग्लो उर्दू हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक मोहम्मद इकराम कादरी सर यांनी पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयाशी संबंधित 80 पृष्ठांची वर्कबुक प्रकाशित केली . यामध्ये बेसिक इंग्रजी साहित्य, वाक्याची रचना , इंग्रजी व्याकरणचे (नियम) जे सामान्य ज्ञान भाषेत उदाहरणाद्वारे समज विले आहे .

तसेच शिष्यवृत्ती परीक्षेशी संबंधित असलेले नियम स्पष्ट केले आहे . प्रथम आवृती मध्ये एकूण एक हजार पुस्तके प्रकाशित केली . इकराम कादरी सर (अँग्लो उर्दु स्कूल नंदुरबार) यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सहभाग मा.श्री एम.वी. कदम साहेब ( शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद ),नंदुरबार मा. श्री बी.आर रोकडे साहेब ( शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद नंदुरबार), मा श्री मारणकर साहेब ( उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक नंदुरबार) जिल्हा परिषद), डॉ. मा श्री युनूस पठाण साहेब ( शिक्षण विस्तार अधिकारी, जिल्हा परिषद नंदुरबार), मा श्री दिनेश देवरे साहेब ( सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक जिल्हा परिषद नंदुरबार), मा श्री भास्कर नाना ( शिक्षण विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार ), मा श्री सी .डी . पाटील साहेब (शिक्षण विभाग जिल्हा परिषद नंदुरबार) , पाटील मॅडम ( शिक्षण विभाग जिल्हा परिषद नंदुरबार), शिंपी सर, चौधरी सर आणि फैय्याज खान सर ( मुख्याध्यापक अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, नंदुरबार) यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. अधिकारी व शिक्षकांनी इकराम कादरी सर अभिनंदन केले. तसेच विद्यार्थीसाठी उपयुक्त पुस्तक म्हणून पुस्तकाचे कौतुक केले .

- Advertisment -

You cannot copy content of this page